जुनी सांगवीतील मंडळांकडून गणरायाला निरोप

जुनी सांगवीतील मंडळांकडून गणरायाला निरोप

Published on

जुनी सांगवी, ता.२ जुनी सांगवीकरांनी प्रथेप्रमाणे सातव्या दिवशी लाडक्या गणरायाला मिरवणुका काढत निरोप दिला.
मोजक्या मंडळांनी पारंपरिक ढोल ताशा पथक व पारंपरिक वाद्यांच्या गजरात सवाद्य मिरवणूक काढली. तर यंदाही डीजेच्या भिंतींचा कर्णकर्कश दणदणाट मिरवणुकात पाहायला मिळाल्याने डीजेमुक्त मिरवणुका संकल्पनेला नेहमीसारखा हरताळ फासल्याचे चित्र सर्वत्र दिसत होते.
संविधान चौक येथे दुपारी दोन वाजल्यापासूनच मंडळांनी डीजेच्या दणदणाटात मिरवणूक रांगेत सहभाग घेतला.
सिझन सोशल ग्रुप प्रशांत शितोळे मित्र परिवाराच्या ‘सांगवीचा राजा’ मंडळाने राधाकृष्ण मयूर रथातून ‘श्रीं’ची पारंपरिक सनई, तुतारी आणि ढोल ताशा पथकांच्या वादनात मिरवणूक काढण्यात आली. बालाजी प्रतिष्ठानचा महाकाल रथ मिरवणुकीचे आकर्षण ठरला. सिद्धिविनायक ट्रस्टच्यावतीने पारंपरिक ढोल ताशा पथकांच्या वादनाने मिरवणूक काढण्यात आली.
मधुबन मित्र मंडळ ट्रस्ट संचलित मधुबन सोसायटी मंडळाने यावर्षी स्वामी समर्थ मूर्तीद्वारे आध्यात्मिक देखावा सादर केला. शितोळेनगर क्रीडा व युवक मित्र मंडळाने यंदा संजीवनी बुटी आणण्यासाठी महाबली हनुमान हा पौराणिक देखावा साकारला. राहीमाई प्रतिष्ठान संयुक्त शिव मित्र मंडळाचे श्रीमंत मानाचा गणपती मंडळाने यंदा अहिरावण महिरावण वध देखावा सादर केला. रणझुंजार मित्र मंडळांनी यावर्षी आकर्षक सोनेरी गणेश महाल देखावा साकारला.
पवारनगरमधील श्री समर्थ मित्रमंडळ, ढोरेनगर मित्र मंडळ, अभिनव तरुण मंडळ, संयुक्त जाणता राजा प्रतिष्ठान, कुंभारवाडा गावठाण मित्र मंडळ, महादेव आळी गावठाण मित्रमंडळ, जय भवानी मित्र मंडळ यांनी आकर्षक फुलांची सजावट करून गणरायाला निरोप दिला.
हिंदवी सोशल वेल्फेअर ट्रस्टने बाहुबली हनुमानासह सजवलेल्या रथातून मिरवणूक काढली. रणझुंजार मित्र मंडळ, श्रीकृष्ण मित्र मंडळ मुळानगर, मुळानगर मित्र मंडळ, प्रेमराज पार्क मित्र मंडळ, शिवाजी तरुण मंडळ, शिवशक्ती व्यायाम मंडळ, गंगानगर मित्र मंडळ, बाळ गोपाळ मित्र मंडळ, लॉयन मित्र मंडळ, संघर्ष मित्र मंडळ, जयमालानगर विकास प्रतिष्ठान आदींनी गणरायाला सवाद्य मिरवणुकीने निरोप दिला.


क्षणचित्रे
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाट, वेताळ महाराज विसर्जन घाटावर निर्माल्य कलश, मूर्ती दान संकलन केंद्र
- विसर्जन घाटांवर अमली पदार्थ विरोधी कृती पथक, भोई प्रतिष्ठान, पुणे व स्वामी विवेकानंद मंदिर शाळेतील स्काऊट गाईड पथकाच्या सहकार्याने अमली पदार्थमुक्तीबाबत नागरिकांचे प्रबोधन
- फिनिक्स सोशल ऑर्गनायझेशन, स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान व इतर सामाजिक संस्थांकडून मंडळांचे ठिकठिकाणी स्वागत
PNE25V46120

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com