शहराला दुसऱ्या दिवशीही झोडपले
पिंपरी, ता. १४ : शहर-उपनगरांत सलग दुसऱ्या दिवशी शहरात मुसळधार पाऊस झाला. दुपारी साडेबाराच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. जवळपास दीड झालेल्या पावसाने रस्ते पाण्याखाली गेले. शहरातील पिंपरी, चिंचवड, निगडी, आकुर्डी, रावेत, चिखली, थेरगाव, रहाटणी, भोसरी या भागांसोबत उपनगरांमध्येही जोरदार पाऊस झाला. रविवार सुट्टीमुळे सहकुटुंब घराबाहेर पडलेल्यांचा मात्र, पावसामुळे त्यांचा खोळंबा झाला.
तुरळक वगळता गेल्या आठ ते दहा गेल्या दिवसांपासून शहरात पावसाने विश्रांती घेतली होती. गेल्या आठवड्यात कडक उन्ह पडत होते. त्यामुळे कमाल तापमातही वाढ होऊन उकाडा जाणवत होता. मात्र, शनिवारी सकाळी (ता.१३) आणि त्यानंतर रविवारीदेखील सकाळी ऊन पडले होते. पण, त्यानंतर मोठा पाऊस झाला. गेल्या आठ-दहा दिवसांत पाऊस थांबल्याने बहुतांश नागरिकांनी छत्री व रेनकोट बाळगले नव्हते. त्यामुळ त्यांना रस्त्याकडेला, पुलाखाली आडोसा घ्यावा लागला.
पावसामुळे खड्ड्यांत पाणी सचल्याने या खड्ड्यांतून मार्ग काढताना वाहन चालकांना कसरत करावी लागत होती. तर रस्त्यावरील सखल भागांमध्यो पाणी साचल्याने रस्ते जलमय झाले होते. सायंकाळीही अधून-मधून पाऊस सुरूच होता.
झाडपडीच्या तीन घटना
मुसळधार पावसामुळे शहरात तीन ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या. सकाळी नेहरूनगर, तर सायंकाळी रहाटणी व थेरगाव भागांमध्ये या घटनांची नोंद झाली. यामध्ये मोठे नुकसान झाले नसल्याचे अग्निशमन दलाने सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.