पिंपरी बचत गट फराळ :  सोमवारच्या अंकासाठी

पिंपरी बचत गट फराळ : सोमवारच्या अंकासाठी

Published on

पिंपरी बचतगट फराळ : सोमवारच्या अंकासाठी
---
बचत गटांना सापला रोजगाराचा मार्ग

पिंपरी, ता. ८ : दिवाळी म्हणजे फराळ हे एक समीकरणच आहे. सध्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकीलाच घरी फराळ करायला जमतेच असे नाही. त्यामुळे तयार फराळ विकत घेण्याकडे महिलांचा कल वाढला आहे. यात घरगुती फराळाला विशेष मागणी आहे. त्यामुळे अनेक बचतगटातील महिला या फराळ विक्रीच्या व्यवसायात उतरल्या आहेत. केवळ दिवाळीच नाही तर गौरी गणपती, लग्न सराई व विविध समारंभांसाठी वर्षभर फराळाला मागणी असते. त्यामुळे दिवाळी फराळ बचत गटातील महिलांसाठी रोजगारांचे उत्तम साधन बनला आहे.

एखादा व्यवसाय एकटी दुकटीने करण्यापेक्षा एकत्र मिळून केल्यास त्याचा फायदा सर्वांनाच होतो हे लक्षात आल्यानंतर आकुर्डीतील क्रांती महिला स्वयंसाह्यता बचत गट व सिंधूताई बचत गटातील महिलांनी एकत्रित फराळ विक्रीला सुरुवात केली. १५ वर्षांपूर्वी फक्त ऑर्डरनुसार या महिला फराळ बनवत असत. त्यांच्या फराळाची गुणवत्ता व चव पाहून परदेशात राहणाऱ्या नातेवाइकांसाठीही फराळाची ऑर्डर त्यांना मिळू लागली. दिवाळीच्या दिवसांतही ऑर्डर आली तर फराळ बनवून देणे हे त्यांच्या व्यवसायाचे वेगळेपण ठरले. त्यामुळे त्यांच्याकडील ग्राहकांची संख्या वाढू लागली. हळूहळू त्यांनी फराळाचे पदार्थांमध्ये वैविध्यता आणली. त्यामुळे सध्या जवळपास ४० फराळाचे पदार्थ त्यांच्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

सुरवातीचा काळ या महिलांसाठी काहीसा खडतर होता. आपल्या पदार्थांची चव जपणे, त्यासाठी गटातील महिलांना पदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण देणे, बाजारातील पॅकिंग पाहून त्याप्रमाणे फराळाचे पॅकेजिंग ठेवणे अशा अनेक बाबी या महिलांनी जाणीवपूर्वक टिकविल्या. परिणामी, गेल्या वर्षी त्यांनी जवळपास चारशे ते पाचशे किलोंचा फराळातून लाखो रुपयांचा नफा कमवला. सध्या या महिलांचे फराळाचे पदार्थ राज्याबाहेर तसेच फिनलंड, इंग्लंड, अमेरिका या देशांतही खासगी कुरिअर सेवेद्वारे पाठवले जात आहेत. तर दुकानदारही त्यांच्याकडून विक्रीसाठी फराळाची खरेदी करतात.

---
१५ वर्षांपासून मी या व्यवसायात आहे. महिलांना प्रशिक्षण देण्यापासून ते मार्केटिंगपर्यंत सर्वकाही आम्ही केलेले आहे. एकमेकींच्या साथीने आम्ही इथपर्यंत पोचलो आहेत. आमच्या फराळाला परदेशातूनही मागणी आहे. परदेशात फराळ निर्यात करण्यासाठी आवश्यक परवान्यासाठी आम्ही अर्ज केला आहे.
- विभावरी इंगळे, अध्यक्ष, सिंधूताई महिला बचत गट
---
दिवाळीमध्ये घरगुती फराळ बनवून घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यासाठी आम्ही महिनाभर आधीच तयारी करतो. नवीन महिलांना प्रशिक्षण देणे, कच्चा माल खरेदी करणे ही कामे पितृपक्षातच सुरू होतात. दिवाळीतील व्याप पाहता आम्ही दोन गटांनी एकत्रित काम सुरू केले आहे. त्याचा फायदा होतो.
- ज्योती टोपे, क्रांती महिला स्वयंसाह्यता बचत गट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com