‘दिवाळीच्या काळात घ्या आरोग्याची काळजी’
पिंपरी, ता. १९ : आनंद व उत्साहाचा सण असलेल्या दिवाळीचे पाच-सहा दिवस संपले, की सर्वत्र दमा आणि श्वसनविकारांचे रुग्ण वाढलेले दिसतात. फटाके आणि त्यामुळे निर्माण होणारा धूर यामुळे हे त्रास उद्भवतात. हा काळ हिवाळ्याच्या सुरुवातीचा असतो. या कोरड्या हवामानात फटाक्यांचा धूर मिसळल्याने प्रदूषण वाढते. परिणामी, दिवाळी काळात सर्वच वयोगटातील नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील हवा प्रदूषण गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. वाहनांची वाढती संख्या, खराब रस्ते, बांधकामे यामुळे शहरातील धुळीचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे यावर्षी दिवाळीपूर्वीच श्वसनाचे आजार वाढलेले आहेत . त्यामुळे दिवाळी आरोग्यदायी व्हावी यासाठी काही पथ्य पाळणे आवश्यक असल्याचे डॉक्टर सांगतात.
फटाक्यांमधून शिसे, मर्क्युरी, कॅडमिअम, बेरिअम, सल्फर डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड असे हानिकारक वायू बाहेर पडतात. जे ब्रोन्कायटीस व सीओपीडीच्या रुग्णांना त्रासदायक ठरू शकतात, शिवाय फटाक्यांच्या आवाजामुळे हृदयरोग, रक्तदाब, मळमळ, चक्कर येणे हे त्रास उद्भवू शकतात. धूर आणि प्रदूषणामुळे डोळ्यांनाही इजा होऊ शकते. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे.
- काय काळजी घ्यावी
मोठ्या आवाजाचे फटाके उडवणे टाळावे
लहान मुलांना फटाक्यांपासून दूर ठेवावे
घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा
प्रदूषण काळात घराच्या खिडक्या, दरवाजे बंद ठेवावे
जास्त तेलकट व तुपकट पदार्थ टाळावेत
पाणी व द्रव पदार्थांचे सेवन वाढवावे
दिवाळी काळात आमच्याकडे श्वसनविकाराच्या रुग्णांचे प्रमाण वाढते. काही प्रकरणांत लहान मुलांना रुग्णालयात दाखल करावे लागते. दिवाळीची साफसफाई करताना धूळ उडते. त्याचाही त्रास लहान मुलांना होऊ शकतो. दिवाळीत धूळ, धूर, प्रदूषण यापासून या रुग्णांना तसेच लहान मुलांना दूर ठेवणे गरजेचे आहे.
- डॉ. शिल्पा चाकणे-बाविस्कर, बालरोग तज्ज्ञ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.