जुनी सांगवी प्रभाग क्रमांक ३२

जुनी सांगवी प्रभाग क्रमांक ३२

Published on

प्रभाग ३२ ः जुनी सांगवी

पुणे, पिंपरी-चिंचवडचे प्रवेशद्वार
- रमेश मोरे

मु ळा-पवना नद्यांच्या संगमावर वसलेले पिंपरी चिंचवड व पुणे शहराचे प्रवेशद्वार अशी जुनी सांगवी प्रभागाची ओळख आहे. हा प्रभाग एकेकाळी एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अभेद्य गड होता. आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप हेच या प्रभागातील दोन तुल्यबळ प्रतिस्पर्धी आहेत. महापालिका निवडणुकीत नवमतदार निर्णायक भूमिका बजावणार आहे. महायुती न झाल्यास पुन्हा येथे भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस यांची तुल्यबळ दुरंगी लढत पाहायला मिळेल.

पक्षीय स्थिती
- राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपनेही कंबर कसली
- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची सद्यःस्थितीत हालचाल नाही
- शिवसेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांचे पारंपरिक मतदार
- महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस यांची जोरदार तयारी दिसत नाही

समाविष्ट भाग
मधुबन सोसायटी, शितोळेनगर, आनंदनगर, गंगानगर, पवारनगर, सांगवी गावठाण, ममतानगर, जयमालानगर, मुळानगर, अभिनवनगर, संगमनगर, लक्ष्मीनगर, पवनानगर, शिंदेनगर, पीडब्ल्यूडी कॉलनी, कृष्णानगर, श्रीनगर, शिवरामनगर, शिवदत्तनगर आदी

दृष्टिक्षेपात
- नवमतदारांचे मतदान निर्णायक ठरणार
- भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे संघटन मजबूत
- गेल्या पाच वर्षांपासून उमेदवारांची तयारी
- गेली दोन महिन्यांपासूनपासून नव्या चेहऱ्यांची तयारी प्रकाश झोतात

प्रचारातील संभाव्य मुद्दे
- अनधिकृत बांधकामे, वाहतूक कोंडी
- चोवीस तास पाणी, सुरळीत वीजपुरवठा
- नदी सुधार, भाजी मंडई, रस्ते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com