सरकारनामा दिवाळी अंक प्रभाग तीन
प्रभाग ३ ः मोशी, डुडुळगाव, चऱ्होली 
--
सर्वात मोठा प्रभाग
नवमतदारही अधिक
- पीतांबर लोहार
मो शी डुडुळगाव चऱ्होली प्रभाग क्षेत्रफळ आणि आकाराने सर्वात मोठा आहे. नवीन गृहप्रकल्प मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे पारंपरिकसह सोसायट्यांतील मतदारांची संख्या अधिक आहे. हा बदल साधारण दहा वर्षांतील आहे. त्यामुळे २०१७ च्या तुलनेत आताच्या महापालिका निवडणुकीत सोसायट्यांतील मतदारांचा कल निर्णायक ठरणार आहे. 
समाविष्ट भाग
मोशी गावठाण, डुडुळगाव, चऱ्होली गावठाण, वडमुखवाडी, चोविसावाडी, ताजणे मळा, काळजेवाडी, कोतवाल वस्ती, बुर्डे वस्ती, पठारे मळा, दाभाडे वस्ती, गंधर्वनगरी, गोखले मळा, अलंकापुरम परिसर. 
पक्षीय स्थिती
- भारतीय जनता पक्षाच्या सत्ताकाळात डीपी रस्ते विकासावर भर होता, पहिला महापौर चऱ्होलीतून दिला.
- राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांचेही मोठे प्राबल्य
- शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांना मानणारे काही प्रमाणात आहेत
- सोसायट्यांमधील मतदारांचा कल कळणे सध्यातरी अवघड
दृष्टीक्षेपात...
- सोसायट्यांमधील मतदार अधिक
- विकास कामांना प्राधान्य देणारा मतदार
- भाजपची फळी मजबूत पण, काही भूमिपुत्र नाराज
- माजी नगरसेवकांसह नवीन इच्छुक अधिक
प्रचारातील संभाव्य मुद्दे
- २०१७ ते २०२२ या कालावधीत केलेली विकासकामे भाजप मांडणार
- भाजपच्या सत्ता काळातील गैरव्यवहार महाविकास आघाडीतील पक्ष मांडणार
- दिवसाआड व अपुरा पाणीपुरवठा
- अर्धवट विकसित रस्ते, संथगतीने सुरू असलेली कामे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

