दिघी-बोपखेल (प्रभाग क्रमांक ४)
प्रभाग ४ ः दिघी-बोपखेल
भाजप प्रभाग राखणार?
- पीतांबर लोहार
दि घी-बोपखेल प्रभाग चार दोन भागांत विभागला आहे. दोन्ही गावांच्या बाजूला लष्कराच्या विविध आस्थापना आहेत. दिघी परिसरात नवीन गृहप्रकल्प झाले आहेत. मात्र, चाळी आणि बैठी घरेही मोठ्या प्रमाणात आहेत. मतदारांची संख्या काही अंशी वाढली आहे. बहुतांश कामगार वर्ग मतदार आहे. स्थानिकांचा प्रभाव अधिक आहे.
समाविष्ट भाग
दिघी गावठाण, बोपखेल गावठाण, परांडेनगर, दत्तनगर, गणेशनगर, भारत मातानगर, सावता माळीनगर, रामनगर, गजानन महाराजनगर, गायकवाडनगर, साई पार्क, समर्थनगर, कृष्णानगर, विजयनगर, व्हीएसएनएल आदी परिसर. 
पक्षीय स्थिती
- गेल्या वेळी चारही नगरसेवक भाजपचे होते. आताही पूर्ण तयारी, मात्र, इच्छुकांची संख्या अधिक
- राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मोठे प्राबल्य
- शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मानणारे काही प्रमाणात
- काँग्रेससह अन्य पक्षांना मतदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागणार
दृष्टीक्षेपात...
- सोसायट्या व चाळींमधील मतदार अधिक
- विकास कामांना प्राधान्य देणारा मतदार
- शिवसेना फुटीमुळे थोडाफार मतदार होता, तोही विभागला
- दिघी व बोपखेल अशी सरळसरळ मतदार विभागणी
प्रचारातील संभाव्य मुद्दे
- २०१७ ते २०२२ या कालावधीत केलेली विकास कामे भाजप मांडणार
- भाजपच्या सत्ता काळातील गैरव्यवहार महाविकास आघाडीतील पक्ष मांडणार
- दिवसाआड व अपुरा पाणीपुरवठा गाजणार
- बोपखेल व खडकी यांना जोडणारा मुळा नदीवरील पूल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

