सुधारित मजकूर घ्यावा- पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक - प्रभाग क्रमांक ३० दापोडी फुगेवाडी - रमेश मोरे
प्रभाग ३० ः दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी
कष्टकरी, चाळकऱ्यांसह 
नवमतदारांकडे लक्ष
- रमेश मोरे 
दा पोडी-फुगेवाडी प्रभागात कष्टकऱ्यांची वस्ती आणि चाळींचा समावेश होतो. राजकीयदृष्ट्या या प्रभागावर आजपर्यंत एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव राहिलेला आहे. अपवाद वगळता आजवर राष्ट्रवादी काँग्रेसचा अभेद्य गड म्हणून दापोडी- फुगेवाडी प्रभाग परिचित आहे. अनेक मातब्बर मंडळींनी संधी आजमावून पाहण्यासाठी विविध पक्षांत जाऊन नशीब आजमावून पाहिले. मात्र, त्यात कोणालाही मतदारांनी स्वीकारले नाही. सद्यस्थितीत पक्ष विभागला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी ताकद आहे. पक्षाचा पारंपरिक मतदार, नवमतदार यामुळे त्यांचा कल निर्णायक ठरणार आहे.
समाविष्ट भाग
कासारवाडी, शंकरवाडी, शास्त्रीनगर, केशवनगर, हिराबाई लांडगे झोपडपट्टी, फुगेवाडी, संजयनगर, दापोडी गावठाण, सिद्धार्थनगर, गणेशनगर, आनंदवन, जयभीमनगर, महात्मा फुलेनगर आदी.
 
पक्षीय स्थिती
- राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी चालू, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची संघटनात्मक बांधणी सुरू 
- शिवसेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, आप, वंचित, मनसेकडूनही लढत शक्य
- भाजप व मित्र पक्ष रिपब्लिकन पक्षाची संघटनात्मक राजकीय, सामाजिक, बांधणी व ताकद मोठी
दृष्टीक्षेपात... 
- ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मानणारा मतदार  
- मागील पाच वर्षांपासून भाजपकडूनही मोठी संघटनात्मक बांधणी  
प्रचारातील संभाव्य मुद्दे
- पाणीटंचाई, उघडी गटारे, रस्ते
- झोपडपट्टी पुनर्वसन व निर्मूलन, कायदा व सुव्यवस्था
- भाजी मंडई, पावसाळ्यात वस्त्या, चाळीत शिरणारे पाणी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

