पिंपरी चिंचवड महापालिका प्रभाग क्रमांक 22, काळेवाडी- विजयनगर
प्रभाग २२ ः काळेवाडी- विजयनगर
पाणी, रस्ते सफाई 
कचऱ्याचा मुद्दा गाजणार
- अमोल शित्रे 
का ळेवाडी प्रभागात स्थानिक, बाहेर जिल्ह्यांतील नागरिकांपासून परप्रांतीयांपर्यंतचा सर्वसमावेशक मतदार आहे. ४५ मीटर बीआरटी रस्ता, जोतिबा उद्यान, क्रीडा मैदान ही महत्त्वाची विकासकामे यापूर्वीच झाली आहेत. दाट लोकवस्तीचा भाग असल्यामुळे रस्ते सफाई, पाणी, कचरा या येथील प्रमुख समस्या आहेत.
समाविष्ट भाग...
काळेवाडी, विजयनगर, आदर्शनगर, पवनानगर, जोतिबा नगर, नढेनगर, राजवाडेनगर, कोकणे नगर इत्यादी.
पक्षीय स्थिती...
- गतवेळी राष्ट्रवादीचा तीन आणि एक अपक्ष असे विजयी
- भाजपकडे तूर्तास तगडे उमेदवार नसल्याने राष्ट्रवादी सरस ठरणार असल्याचे चित्र
- शिवसेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि काँग्रेसला उमेदवार मिळणे कठीण
- राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा होण्याची शक्यता, इतर पक्षांसमोर नवीन मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान 
दृष्टीक्षेपात...
- पायाभूत विकासाला प्राधान्य
- भाजपने आयात उमेदवार लादल्यास प्रभागातील मतदार त्यांना स्वीकारतील का? हा प्रश्न  
- मतदार संख्या वाढली असून, आठ हजारावर नवमतदार
- मजूर, घरेलू कामगार, बांधकाम कामगार वर्ग मोठा
प्रचारातील संभाव्य मुद्दे....
- डीपी रस्त्यांचा विकास, नदी सुधार प्रकल्प
- छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकाचे सुशोभीकरण
- निळ्या पूररेषेमधील बांधकामे, वाहतूक कोंडी
- अंतर्गत रस्ते विकास, पाणीपुरवठा, क्रीडांगणे, मैदाने
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

