प्रभाग क्रमांक २३, थेरगाव
प्रभाग २३ ः थेरगाव
संमिश्र मतदार;
प्रश्न वेगवेगळे
- अमोल शित्रे 
थे रगाव प्रभागाचा ७५ टक्के परिसर पूर्वीच्या पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या (पीसीएनडीटीए) हद्दीत येतो. काही वर्षांपूर्वी पीसीएनडीटीएचे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात (पीएमआरडीए) विलीन झाले. त्यावेळी विकसित भाग महापालिकेकडे तर मोकळ्या जागा पीएमआरडीएकडे वर्ग केल्या. बैठी घरे, गृहनिर्माण सोसायट्या आणि निवासी इमारती असून, भाड्याने राहणारा वर्ग मोठा आहे. त्याचबरोबर आयटी कामगार, व्यावसायिक, मजूर, व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात राहतो.
समाविष्ट भाग
प्रसुनधाम, गंगा आशियाना, कुणाल रेसिडेन्सी, स्विस काऊंटी, थेरगाव गावठाण, पडवळनगर, पवारनगर, बाबूजीबुवा नगर, जय मल्हारनगर, धनगरबाबा मंदिर परिसर, अशोका सोसायटी, साईनाथनगर, समर्थ कॉलनी इत्यादी. 
पक्षीय स्थिती
- २०१७ च्या निवडणुकीत भाजपचे तीन, अपक्ष एक नगरसेवक
- राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे स्वतंत्र पॅनेल असूनही यश नाही 
- भाजपचे तळागाळात काम, शिवसेनेचा सक्रिय सहभाग 
- राष्ट्रवादीची कसोटी लागणार 
दृष्टीक्षेपात....
- थेरगाव रुग्णालय, बटरफ्लाय उड्डाणपूल, सिमेंट रस्ते, पदपथ वगळता ठळक कामे नाहीत 
- महापालिकेच्या विकास आराखड्यातील एकही काम सध्या प्रलंबित नाही
- जागा उपलब्ध नसल्याने मोठे आरक्षण नसल्याने निवडणूक विकासाच्या मुद्यांवर होण्याची शक्यता कमी 
प्रचारातील संभाव्य मुद्दे...
- साडेबारा टक्के जमीन परतावा
- प्रॉपर्टी कार्ड नावावर करून देणे
- अनधिकृत बांधकामे, पाणी, कचरा
- प्रस्तावित कर्करोग रुग्णालय
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

