‘सकाळ नाट्य महोत्सवा’ला ‘सही’ दाद
पिंपरी, ता. २७ ः ‘सही रे सही’ नाटकाला २३ वर्षे झाली आहेत. हे नाटक अजून ज्या भागात पोचले नाही तिथे सकाळ नाट्य महोत्सवामुळे हे नाटक पोचले आहे, अशी भावना ज्येष्ठ अभिनेते भरत जाधव यांनी व्यक्त केली. सकाळ नाट्य महोत्सवाचा समारोप रविवारी (ता.२६) ‘पुन्हा सही रे सही’ या नाटकाने झाला. त्यावेळी ‘सकाळ नाट्य महोत्सवा’चे कौतुक करताना ते बोलत होते.
‘सकाळ’ माध्यम समूह सातत्याने विविध उपक्रम राबवत असते. याबाबत ‘सकाळ’चे मनापासून कौतुक. दरवेळी रसिकही आम्हाला दाद देतात. त्याबाबत पिंपरी चिंचवडच्या रसिकांचेही कौतुक, असेही भरत जाधव म्हणाले.
नाटकादरम्यान ‘सकाळ’च्या वतीने या नाटकातील सर्व कलाकारांचा सन्मान करण्यात आला.
दरम्यान, ‘पुन्हा सही रे सही’ नाटकाला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला. श्रीमंत दामोदर पंत नाटकातील ‘गोड गोजिरी’ या नाटकाने भरत जाधव यांच्या मंचावरील प्रवेशाला नाट्यरसिकांनी ‘वन्स मोअर’ची दाद दिली. भरत जाधव यांनी रंगवलेल्या रंगा, हरी, गलगले, मदन सुखात्मे या चौरंगी भूमिकेला प्रेक्षकांनी टाळ्या आणि शिट्ट्यांनी प्रतिसाद दिला. मदन सुखात्मे हे उद्योजक दोन महिने बेपत्ता होतात. त्यांच्या मालमत्तेवर हक्क दाखविण्यासाठी वारसदारांची चाललेली रस्सीखेच, त्यातून मदन सुखात्मेसारखे दिसणारे रंगा, हरी व गलगले यांची एन्ट्री अशा कथानकाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले.
मध्यंतरापूर्वी तीन जणांच्या भूमिकेत भरत जाधव व इतर कलाकारांनी सादर केलेले पुन्हा ''सही पुन्हा सही'' हे गाणे वाहवा मिळवून गेले. भरत जाधव यांच्या सोबत जयराज नायर, मनोज टाकणे,घनश्याम घोरपडे, प्रशांत विचारे, जुई सोनटक्के, ऐश्वर्या शिंदे, शिवानी कथले, संतोष गायकर या कलाकारांच्याही अभिनयाचे प्रेक्षकांनी कौतुक केले.
--------
फोटो
62812
62813
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

