निगडीत जलवाहिनीसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून दुचाकीस्वार जखमी
पिंपरी, ता. २६ : निगडीतील भक्ती-शक्ती परिसरात महापालिकेने जलवाहिनीच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून बुधवारी (ता. २६) सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास एक दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला. केवळ हेल्मेट घातल्यामुळे त्याचा जीव वाचला.
श्रीकृष्ण मंदिरासमोरील खड्ड्यापाशी त्याची दुचाकी घसरली आणि खड्ड्यात पडली. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार निगडी ते दापोडी दरम्यान पालिकेने नवी मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू केले आहे, मात्र तेथे सुरक्षेची कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. खड्ड्याभोवती बॅरिकेड्स, प्रकाशव्यवस्था तसेच काम सुरू असल्याची माहिती देणारे फलक असे काहीच नाही. खड्डा सुमारे सहा फूट आहे. त्यामुळे वाहनचालकांना खोदकामाचा अंदाज येत नाही. त्यामुळे यानंतरही तेथे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.
आजच्या घटनेनंतर उपस्थित स्थानिकांनी महापालिका प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केला. काम सुरू असलेल्या ठिकाणी तत्काळ सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणीही अनेकांनी केली. ‘महापालिकेने कामे करणे आवश्यक आहे, पण सुरक्षेचा प्रश्न दुर्लक्षित करून अशा प्रकारे जनतेला धोक्यात टाकणे अक्षम्य आहे,’ अशी प्रतिक्रिया काही स्थानिकांनी व्यक्त केली.
दरम्यान, महापालिका अधिकाऱ्यांनी यापुढे दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने बॅरिकेड्स आणि फलक लावण्याचे आश्वासन दिले आहे.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

