यशवंतराव यांचे राजकारण समन्वयवादी

यशवंतराव यांचे राजकारण समन्वयवादी

Published on

पिंपरी, ता. २८ : ‘यशवंतराव चव्हाण यांचे राजकारण समन्वयवादी होते, म्हणून आत्ताच्या राजकारण्यांनी यशवंतनीती स्वीकारावी!’, असे मत साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी मांडले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, पिंपरी-चिंचवड विभागाच्या वतीने लातूर येथील माजी आमदार शिवाजीराव पाटील-कव्हेकर आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पाटील-कव्हेकर या दांपत्याला यशवंत-वेणू सन्मान देऊन गौरविण्यात आले. यावेळी डॉ. सबनीस बोलत होते.
चिंचवड येथील ऑटोक्लस्टर सभागृह येथे गुरुवारी (ता. २७) पार पडलेल्या या सोहळ्याला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, पद्मश्री गिरीश प्रभुणे, सुनिताराजे पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी विशाल पलांडे (यशवंतराव चव्हाण युवा उद्योजक पुरस्कार) व ज्येष्ठ साहित्यिक नंदकुमार मुरडे (यशवंतराव चव्हाण सह्याद्री भला माणूस पुरस्कार) यांना पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
डॉ. सबनीस पुढे म्हणाले, ‘बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या यशवंतरावांना सात्त्विक सुगंधी फुलाप्रमाणे असणाऱ्या वेणूताईंची साथ लाभली होती. शिवाजीराव पाटील-कव्हेकर आणि प्रतिभा पाटील-कव्हेकर या दांपत्याचे सामाजिक कार्य खूप व्यापक आहे. ते यशवंत-वेणू गौरवासाठी पात्र आहेत!’
शिवाजीराव पाटील म्हणाले, ‘यशवंतराव हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. वेणूताईंनी त्यांना सावलीसारखी साथ दिली. हे राज्य मराठ्यांचे नसून मराठीचे आहे, अशी यशवंतराव यांची भूमिका होती. २०४० मध्ये भारत महासत्ता होईल!’ प्रतिभा पाटील कव्हेकर म्हणाल्या, ‘यशवंत-वेणू गौरव हा जीवनातला एक आनंदाचा क्षण आहे.’
वृक्षपूजन आणि नितीन देशमुख रचित ‘यशवंतराव’ या कवितेच्या सादरीकरणाने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. पुरुषोत्तम सदाफुले यांनी प्रास्ताविक केले. सुदाम भोरे यांनी स्वागत केले. बाजीराव सातपुते यांनी ‘यशवंतराव इतिहासाचं एक सोनेरी पान’ या विषयावर व्याख्यान दिले. मानसी चिटणीस यांनी मानपत्राचे वाचन केले. अरुण गराडे, प्रतिमा काळे, जयवंत भोसले, प्रा. प्रभाकर दाभाडे, राजू जाधव, प्रदीप गांधलीकर यांनी संयोजनात सहकार्य केले. प्रा. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले. संगीता झिंजुरके यांनी आभार मानले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com