‘द सोलफुल मेलोडिज’ला प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद
पिंपरी, ता. २८ : ‘तुम पुकार लो,’ ‘या दिलकी सुनो,’ ‘ये रात ये चाँदनी,’ ‘बेकरार करके,’ ‘भँवरा बडा नादान,’ ‘जाने वो कैसे लोग थे,’ ‘तेरी दुनिया में,’ ‘ना तुम हमे जानो,’ ‘वो शाम कुछ,’ ‘ना ये चाँद होगा,’ ‘जरा नजरोंसे कहे दो’ या व अशा युगुल आणि द्वंद्व स्वरातील सुंदर गीतांना श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिली.
निमित्त होते इंडियन म्युझिकल क्लब प्रस्तुत हेमंतकुमार यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित ‘द सोलफुल मेलोडिज ऑफ हेमंतकुमार’ या अवीट गोडीच्या हिंदी-मराठी गीतांच्या सुरेल सांगीतिक मैफलीचे. निगडी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर प्रेक्षागृहात पार पडलेल्या या मैफिलीत सादर झालेल्या गाण्यांनी रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले. राखी झोपे यांची संकल्पना आणि अनिल झोपे यांच्या संयोजनातून साकार झालेल्या या राजकुमार सुठंवाल, आशुतोष ठाकूर, मंगेश उमराणी, सुकेतू शाह, संजीव रानडे, सागर पाटील, दत्तात्रय कुंभार, उमेश घाणेकर या गायकांसह स्वाती केसकर, नम्रता सारडा, नयना काळकर यांनी मैफलीत आपला सुरेल सहभाग नोंदवला. रसिक श्रोत्यांना ‘मी डोलकर...’ या सदाबहार गीतावर नृत्य करण्याचा मोह आवरता आला नाही. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या मैफलीचा समारोप ‘प्रीतीच्या चांदराती...’ या भन्नाट मराठमोळ्या गीताने करण्यात आला. मनीष गोखले यांनी निवेदन केले.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

