जेव्हा समाज घडतो तेव्हा राष्ट्र घडते : डॉ. निरगुडकर

जेव्हा समाज घडतो तेव्हा राष्ट्र घडते : डॉ. निरगुडकर

Published on

पिंपरी, ता. ८ : ‘‘जेव्हा समाज घडतो तेव्हा राष्ट्र घडते, जेव्हा समाज खचतो तेव्हा राष्ट्रही खचते,’’ असे मत डॉ उदय निरगुडकर यांनी व्यक्त केले.
श्रीमन महासाधू मोरया गोसावी संजीवन समाधी सोहळ्यात ‘सध्याचा सामर्थ्यशाली भारत’ या विषयावर डॉ. निरगुडकर यांचे व्याख्यान आयोजित केले होते. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी डॉ. निरगुडकर म्हणाले, ‘‘प्लासीच्या लढाईमध्ये ३००० इंग्रज सैनिकांविरोधात सिराज उद्दौलांचे ५० ते ६० हजार सैनिक लढले. मात्र, सगळे जाती धर्मात विभागले गेले होते. त्यामुळे हा पराभव झाला. परिणामी, आपली १९० वर्षे गुलामगिरीत गेली. ब्रिटिशांनी या काळात ४५ ट्रिलियन डॉलर एवढी भारतातील संपत्ती लुटली. १८ व्या शतकात जेव्हा इंग्लंडमध्ये मेट्रोचे काम सुरू झाले तेव्हा तो खर्च भारतीयांकडून वसूल झाला. मात्र, गेल्या १० वर्षांत परिस्थिती बदलली आहे. सध्या सौदी अरेबियामध्ये क्रूड ऑइलमुळे जेवढी आर्थिक उलाढाल होते. त्यापेक्षा जास्त उलाढाल भारतीय आयटी क्षेत्रात सॉफ्टवेअर निर्यातीतून होते. भारतातील कॉलसेंटरने ठरवलं तर अमेरिकन एअरलाइन काही मिनिटात बंद करू शकतात. ही आज आपली ताकद आहे.’’
चिंचवड गावातील मोरया गोसावी समाधी मंदिरा शेजारील प्रांगणात पार पडलेल्या या व्याख्यानाला विश्वस्त जितेंद्र देव उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com