घराघरांतील, बचतगटांतील मतदारांशी संवाद
जुनी सांगवी, ता. ९ : दापोडी-फुगेवाडी क्रमांक ३० मध्ये भारतीय जनता पक्षाने प्रचार अधिक गतिमान करत निवडणूक रणधुमाळीला वेग दिला आहे. भाजपचे उमेदवार संजय ऊर्फ नाना काटे, प्रतिभा जवळकर, चंद्रकांता सोनकांबळे आणि उषा मुंढे यांनी प्रभागातील विविध वस्त्यांमध्ये पदयात्रा काढून प्रत्यक्ष घरभेटी देत मतदारांशी थेट संवाद साधला.
महात्मा फुलेनगर, जय भीमनगर, बाराथे वस्ती, दापोडी गावठाण तसेच आत्तार वीटभट्टी परिसरात उमेदवारांनी घराघरांत जाऊन नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पाणीटंचाई, रस्त्यांची दुरवस्था, कचरा व्यवस्थापन, आरोग्य सुविधा आणि भुयारी गटारांच्या समस्यांवर भाजपच्या माध्यमातून निश्चितच तोडगा निघेल, असा विश्वास उमेदवारांनी नागरिकांना व महिला बचत गटांना दिला.
या प्रचार मोहिमेत भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. धर्मेंद्र क्षीरसागर, निशांत गायकवाड, रवी क्षीरसागर, कालिचरण पाटोळे, विजय पवार, मुकुंद कांबळे, तेजस भोसले, अभिषेक क्षीरसागर, अरुण कांबळे, हर्षद भोसले, आशिष पंडित, संतोष गायकवाड, सतीश पटेकर आदींचा समावेश होता.
शहरातील इतर उपनगरांबरोबर दापोडी प्रभागाची तुलना करताना दापोडी प्रभागाचा विकास झाला नाही. प्रभागातील रखडलेला विकास पुन्हा गतिमान करणे व नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणे हाच आमचा संकल्प आहे.
- संजय ऊर्फ नाना काटे, उमेदवार, भाजप
दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी या प्रभागात अनेक प्रलंबित प्रश्न आहेत. कष्टकरी वस्ती चाळीचा भाग म्हणून ओळख असलेल्या प्रभागाचा सर्वांगीण विकास करायचा आहे.
- चंद्रकांता सोनकांबळे, उमेदवार, भाजप
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

