संविधान आणि युद्धाचे संकट टाळण्यासाठी भाजपला हरवा
पिंपरी, ता. ९ : ‘२०२९च्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका व्हायच्या असतील तर भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक यांना पराभूत केले पाहिजे. कारण भाजप जिंकले तर निवडणुका विसरून जा. ते एकाच पक्षाचे राज्य आणतील आणि या देशाचे संविधान कधीही बदलतील हे राजकारणातील हे संकेत आहेत. संविधान बदलण्याचे एक मोठे संकट देशावर आहे आणि दुसरे संकट युद्धाचे आहे. या दोन्ही संकटांतून बाहेर पडण्यासाठी भाजपला पराभूत करा,’ असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्टीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे केले.
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीतील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक मैदानावर आयोजित परिवर्तन सभेत ते बोलत होते.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य महासचिव ॲड. प्रियदर्शनी तेलंग, प्रदेश उपाध्यक्ष अनिल जाधव, प्रदेश उपाध्यक्ष ॲड. सर्वजीत बनसोडे उपस्थित होते.
ॲड. आंबेडकर म्हणाले, देशात फक्त एकच पक्षाचे राज्य आणायचं आहे. चीन सारखी परिस्थिती निर्माण झाली पाहिजे. जिथे आवाज उठवता येणार नाही. इथे फक्त देवाधर्माशिवाय चर्चा नाहीत. धर्माचे ठेकेदार आता महात्मा फुले, महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वाईट बोलत आहेत.
पुणे टार्गेट
पुण्यामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्यामध्ये एक सदर्न कमांड आणि दुसरे हवाई दलाचा तळ. उद्या युद्ध झाले तर शत्रूच्या टार्गेटवर पुणे असणार आहे. म्हणून भाजपला मतदान करणाऱ्यांना सांगू इच्छितो की आपले भांडण सुरू राहील. पण जिवंत राहिलो तर ना... जिवंत राहायचे असेल तर एकच मार्ग शिल्लक राहिला आहे तो म्हणजे डोनाल्ड ट्रम्पला सांगितले पाहिजे तुम्ही मोदींचे कंबरडे मोडू नको तर आम्हीच मोडतो.
---
डॉ. आंबेडकर म्हणाले
- मोदी जगाचे चौथा विश्व गुरू पाहत आहेत, अमेरिकेचे ट्रम्प, चीनचे जिनपिंग आणि रशियाचे पुतीन हे तीनच विश्वगुरू, मोदींना ते मान्य करणार नाहीत
- मोदी यांना धडा शिकवण्यासाठी भारताची अर्थव्यवस्था मोडण्याची शपथ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली, यात सर्वसामान्य जनता भरडली जात आहे.
- मोदींच्या विरोधात अमेरिकेत १२ वर्षांपूर्वी अटक वॉरंट, भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांच्या सोशल मीडिया खात्यावरील ही सर्व माहिती डिलीट करण्यासाठी दबाव आणला जात आहे
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

