सांगवी वाहतूक विभागातर्फे
चालकांना जनजागृती मोहीम

सांगवी वाहतूक विभागातर्फे चालकांना जनजागृती मोहीम

Published on

जुनी सांगवी, ता. १० ः सांगवी व उपनगर शहर परिसरात विविध चौक व महत्त्वाच्या ठिकाणी सांगवी पोलिस वाहतूक विभागाच्यावतीने रहदारी नियम व सुरक्षेबाबत विशेष जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत वाहतूक पोलिस, अंमलदार व वॉर्डन यांनी रिक्षा, दुचाकी व चारचाकी वाहनचालकांना वाहतुकीचे नियम समजावून सांगत नियमांचे पालन करण्याचे महत्त्व पटवून दिले.
वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणाऱ्या वाहनचालकांना यावेळी पुष्प देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. नियम पाळणाऱ्या नागरिकांचा सन्मान केल्यामुळे वाहनचालकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. ‘दंड नव्हे तर सन्मान’ या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे रस्ते सुरक्षेबाबत सकारात्मक संदेश पोहोचल्याचे चित्र दिसून आले.
पोलिस निरीक्षक सुदाम पाचोरकर म्हणाले, ‘‘अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी कारवाईपेक्षा जनजागृती महत्त्वाची आहे. चालकांनी हेल्मेट, सीटबेल्टचा वापर करणे, सिग्नलचे पालन करणे, वेगमर्यादा पाळणे आणि मोबाईलवर बोलत वाहन न चालवणे आवश्यक आहे. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने नियमांचे पालन केल्यास अपघातांमध्ये निश्चितच घट होईल.’’
या उपक्रमाला वाहनचालकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक चालकांनी पोलिस प्रशासनाच्या या सकारात्मक उपक्रमाचे स्वागत करत भविष्यातही वाहतूक नियम पाळण्याचा संकल्प व्यक्त केला. रस्ते सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून सुरक्षित, शिस्तबद्ध आणि अपघातमुक्त वाहतुकीसाठी प्रशासन व नागरिक यांचा समन्वय अधिक मजबूत होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
पाचोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजाराम काकडे, सविता गेंगजे, जयश्री काकडे, शुभम वाट, रघुनाथ दगडे, वाहतूक वॉर्डन स्वप्नील मनसुके आदींनी उपक्रमात सहभाग घेतला.
PIM26B20812

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com