पिंपरी चिंचवड महापौरांची सहा फेब्रुवारीला निवड
पिंपरी, ता. २३ : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर, उपमहापौर पदांसाठी ६ फेब्रुवारीला निवड होणार आहे. विभागीय आयुक्तांनी त्यासाठी मान्यता दिली असून महापालिका प्रशासन लवकरच निवडीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर करेल. या निवडीसाठी सहा फेब्रुवारी रोजी विशेष सभा घेण्यास विभागीय आयुक्तांनी मान्यता दिली. सभेच्या अध्यक्षस्थानी विभागीय आयुक्त किंवा त्यांचे प्रतिनिधी असतात. महापौर आरक्षणाची सोडत २२ जानेवारी रोजी निघाली. यामध्ये पिंपरी चिंचवडचे महापौरपद सर्वसाधारण खुला प्रवर्गासाठी जाहीर झाले. महापालिकेत भाजपचे ८४ नगरसेवक विजयी झाले आहेत. त्यामुळे त्यांचा महापौर होणार हे निश्चित झाले आहे. प्रशासनाकडून अर्ज विक्री व स्वीकृती कालावधीबाबत स्पष्टता दिली जाणार आहे, असे नगरसचिव मुकेश कोळप यांनी सांगितले.
................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

