महिलेच्या खोट्या तक्रारीमुळे
पोलिसांची रात्रभर धावपळ

महिलेच्या खोट्या तक्रारीमुळे पोलिसांची रात्रभर धावपळ

Published on

पिंपरी, ता. ३ : पहिल्या पतीपासून झालेल्या मुलीला किंवा तुला मारून टाकेन, अशी धमकी दुसऱ्या पतीने दिल्याची तक्रार एका महिलेने चिंचवड पोलिस ठाण्यात दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. अखेर ही मुलगी वडिलांबरोबरच घरात झोपल्याचे आढळले. महिलेची तक्रारही खोटी असल्याचे स्पष्ट झाले, मात्र त्यामुळे पोलिसांची रात्रभर धावपळ झाली. मंगळवारी (ता. ३) मध्यरात्रीनंतर हा प्रकार घडला.
‘साहेब, तो माझ्या मुलीला मारून टाकण्यासाठी घेऊन गेला आहे,’ असे सांगत एक महिला पोलिस ठाण्यात आली. ‘दुसरा पती मद्यपी असून तो मला मारहाण करतो. पहिल्या पतीपासून झालेल्या सहा वर्षीय मुलीला घेऊन तो निघून गेला आहे. आज एकतर तुला मारेन किंवा मुलीला मारेन,’ अशी धमकी त्याने दिल्याचे महिलेने सांगितले.
पोलिसांनी तातडीने हालचाल सुरू केली. महिलेच्या पतीचा मोबाईल बंद लागत होता. तिला पोलिस ठाण्यात बसवून पोलिसांनी शोध सुरू केला. अखेर पहाटे तीनच्या सुमारास पोलिस संबंधित महिलेच्या घरी गेले. तेव्हा मुलगी व महिलेचा पती घरातच झोपलेले आढळले. अधिक चौकशीत या महिलेला पहिल्या पतीला सोडून दिले असून तिला मुलगी दुसऱ्या पतीपासूनच झाल्याचे स्पष्ट झाले. सोमवारी रात्री पती-पत्नीमध्ये भांडण झाले. त्यामुळे पती मुलीला घेऊन गावाकडे निघाला होता. त्यानंतर महिलेने पोलिस ठाण्यात धाव घेऊन खोटी तक्रार दिली. दरम्यान, तिचा पती गावाकडे न जाता मुलीसह घरी परत येऊन झोपला होता.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com