उद्योजक हे राष्ट्राचे भाग्यविधाते

उद्योजक हे राष्ट्राचे भाग्यविधाते

Published on

पिंपरी, ता. १२ : ‘यशस्वी उद्योजक हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर राष्ट्राचे भाग्यविधाते आहेत,’ असे गौरवोद्‍गार ज्येष्ठ समाजसेवक गिरीश प्रभुणे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषदेतर्फे भारतरत्न जे. आर. डी. टाटा आणि उद्योगमहर्षी रतन टाटा पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. ऑटोक्लस्टर सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंतरराष्ट्रीय उद्योग सल्लागार सचिन ईटकर होते. परिषदेचे अध्यक्ष सुदाम भोरे प्रमुख उपस्थित होते. तौरल इंडिया लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी भरत गीते यांना भारतरत्न जे. आर. डी. टाटा उद्योगरत्न पुरस्कार प्रदान करून गौरविले. साई ली इलेक्ट्रॉनिक्सचे कार्यकारी संचालक संदीप शिंदे (उद्योगरत्न), सिद्धकला ऑटो स्टॅम्पिंगचे संचालक सुधीर भांदुर्गा (उद्योगविभूषण), वोगोफाय इंडस्ट्रीजचे डॉ. गणेश घंगाळे (उद्योगभूषण), एसबीआर मशिन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश राऊत (उद्योगभूषण) आणि महेक इंडस्ट्रीजच्या संचालिका रेश्मा मुल्ला (उद्योगसखी) यांचाही गौरव केला. एका लहान बालिकेच्या हस्ते वृक्षपूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ केला. श्रमश्री बाजीराव सातपुते यांनी ‘टाटांना अभिप्रेत असलेला एकविसाव्या शतकातील उद्योजक’ या विषयावर व्याख्यान दिले. पुरुषोत्तम सदाफुले यांनी पुरस्कारार्थींशी हितगुज करीत त्यांच्या भावना जाणून घेतल्या.
प्रभुणे म्हणाले, ‘‘भगवान श्रीकृष्ण यांनी गीतेतून कर्मयोगसिद्धांत मांडला आहे. स्वातंत्र्याच्या अमृतकाळापासून शतक गाठेपर्यंत देशाची स्वयंपूर्णतेकडे वाटचाल सुरू झाली आहे. उद्योजक हे जणू भावी इतिहासातील सुवर्णपाने आहेत.’’
उद्योगरत्न पुरस्कार स्वीकारल्यानंतर भरत गीते म्हणाले, ‘‘एक कामगार म्हणूनच माझ्या औद्योगिक जीवनाचा प्रवास सुरू झाला. उच्चशिक्षण घेऊन विदेशात गेल्यावरही पुढे भारत देशातच काम करायचे आणि ॲल्युमिनियमविषयी प्रगत तंत्रज्ञान देशात आणायचे हा निश्चय केला होता. ग्रामीण पार्श्‍वभूमीमुळे व्यावसायिक चढ-उतार सोसत सकारात्मक मानसिकतेमुळे यशस्वी झालो; तसेच आत्मनिर्भर भारत अभियानात सहभागी होता आले याचा मनस्वी आनंद वाटतो.’’
ईटकर म्हणाले, ‘‘राष्ट्रनिर्माण ही टाटा उद्योगसमूहाने बांधीलकी मानली. विकसित महाराष्ट्र आणि विकसित भारत ही संकल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी उद्योजकांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.’’
संयोजन अरुण गराडे, प्रा. डॉ. संभाजी मलघे, महेंद्र भारती, सुप्रिया सोळांकुरे, राजेंद्र वाघ, प्रभाकर वाघोले, प्रतिमा काळे, इंद्रजीत पाटोळे यांनी केले. श्रीकांत चौगुले यांनी सूत्रसंचालन केले. जयश्री श्रीखंडे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com