

पिंपरी, ता. १२ : घोरावडेश्वर डोंगरावर तीन दिवस लागलेल्या आगीमुळे हजारो हजार झाडे करपली आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून जपलेली झाडे भस्मसात झाल्यामुळे निसर्गप्रेमी आणि नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. वनविभाग आणि निसर्गप्रेमींच्या प्रयत्नांमुळे ही आग आटोक्यात आली असली तरी घटनेमुळे झाडांचे मोठे नुकसान झाले आहे.
शनिवार रविवारी सकाळी मॉर्निंग वॉक साठी तसेच ट्रेकिंग साठी घोरावडेश्वर प्रसिद्ध आहे. या डोंगरावर शेकडो प्रकारच्या झाडांच्या जमाती आहेत. या परिसरात विविध कीटक, प्राणी, पक्ष्यांचे वास्तव्य आहे. मात्र, आगीच्या प्रकारांमुळे या घटकांना देखील हानी पोहोचते. नागरिकांच्या सर्रास वावरामुळे लहान झाडे देखील नष्ट होतात. घोरावडेश्वर डोंगर संवर्धनासाठी पिंपरी चिंचवड शहरातील अनेक संस्था श्रमदान करुन देशी झाडांचे जतन संवर्धन करत आहेत. यासाठी पाण्याच्या टाक्या बसवून झाडांना पाणी देऊन झाडे जगवली जातात. उन्हाळ्यात झाडे जगवणे मोठे मुश्किल असते. येथे अनेकदा आगीच्या घटना घडतात मात्र ही आग सर्वात मोठी असल्याचे निसर्गप्रेमींनी सांगितले.
गेल्या पंधरा वर्षांत घोरावडेश्वर येथे विविध स्वयंसेवी संस्थांनी श्रमदान करून देशी वृक्षांचे रोपण केले आहे. यातील सुमारे दीड हजार झाडे आगीमुळे बाधित झाली आहेत. झाडांसाठीच्या जलवाहिन्या, टाकीचेही यात नुकसान झाले आहे.
आगीस कारणीभूत व्यक्तींवर कठोर कारवाई व्हावी.
- विजय सातपुते, सचिव, निसर्गमित्र विभाग सावरकर मंडळ.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.