भोसरीत चोरट्याच्या चाकूहल्ल्यात दोघे जखमी

भोसरीत चोरट्याच्या चाकूहल्ल्यात दोघे जखमी

Published on

पिंपरी, ता. २४ : घरात चोरी करून पळणाऱ्या दोघांना नागरिकांनी अडवले. त्यावेळी एका चोरट्याने पिस्तूल दाखवत पळ काढला. तर, दुसऱ्याला नागरिकांनी पकडत पोलिसांच्या ताब्यात दिले. या झटापटीत चोरट्याच्या चाकू हल्ल्यात दोन नागरिक जखमी झाले. हा प्रकार भोसरीतील इंद्रायणीनगरात साईदर्शन सोसायटीत मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास घडला.

सागरसिंग ऊर्फ फंटयासिंग बावरी-अंधरेले (वय २७ रा. जालना) असे पकडलेल्या चोरट्याचे नाव आहेत. या प्रकरणी धर्मेंद्र झा (रा. इंद्रायणीनगर) यांनी भोसरी पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादी मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. हे पाहून चोरट्यांनी घरात प्रवेश करत ५७ हजारांच्या ऐवजावर डल्ला मारला. दरम्यान, तेथून पळताना परिसरातील नागरिकांनी त्यांना अडवले. त्यावर सागरसिंग याने चाकूने हल्ला केला. तर, दुसरा आरोपी पिस्तूल दाखवून पसार झाला. नागरिकांनी सागरसिंग याला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्याकडून चोरीचा ऐवज, घरफोडीचे साहित्य, चाकू तसेच काडतूस पोलिसांनी जप्त केले आहे.

आरोपीवर १७ गुन्हे दाखल
हे आरोपी जालना येथून आले होते. या गुन्ह्यासाठी त्यांनी वापरलेली दुचाकीही चोरीची असून, या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. सागरसिंग याच्यावर जालना व नागपूर येथे एकूण १७ गुन्हे दाखल आहेत. तर, पिस्तूलधारी चोरट्याचा शोध सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com