पुस्तक हा सांस्कृतिक ऐवज!
पिंपरी, ता. १ : ‘पुस्तक हा आपला सांस्कृतिक ऐवज असतो!,’ असे विचार ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. स्नेहल तावरे यांनी व्यक्त केले. शहाजी कांबळे लिखित ‘स्वरयात्रा’ कथासंग्रहाचे प्रकाशन करताना प्रा. तावरे बोलत होत्या. चिंचवड गावातील विरंगुळा केंद्र येथे पार पाडलेल्या या कार्यक्रमाला चिंचवड ज्येष्ठ नागरिक संघाचे रमेश इनामदार, गोपाळ भसे, लेखक शहाजी कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा. डॉ. स्नेहल तावरे म्हणाल्या, ‘लिहिण्याची प्रेरणा महत्त्वाची असून, शहाजी कांबळे यांचे सहज शैलीतील लेखन मनाचा ठाव घेते. विशेषतः कथांचा अनपेक्षित शेवट हे त्यांचे वैशिष्ट्य जी. ए. कुलकर्णी यांच्या लेखनाची आठवण करून देणारे आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलेल्या कांबळे यांच्या कथा समाजाला मार्गदर्शक आहेत.’
‘सेवानिवृत्तीनंतर माझ्या लेखनाचा आवाका वाढला अन् त्याला वेग आला. यासाठी पत्नी, मित्र परिवार व कार्यालयीन सहकारी यांचे प्रोत्साहन मोलाचे ठरले,’ अशा भावना लेखक शहाजी कांबळे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केल्या. दीपप्रज्वलन, प्रतिमापूजन आणि त्रिवार ओंकाराने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. शहाजी कांबळे यांच्या शालेय मित्र परिवाराने कार्यक्रमाचे संयोजन केले. नंदकुमार मुरडे यांनी सूत्रसंचालन केले. नीलिमा कांबळे यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

