ज्येष्ठ रंगकर्मींच्या हस्ते ‘भरतमुनि रंगघन’ चे उद्घाटन

ज्येष्ठ रंगकर्मींच्या हस्ते ‘भरतमुनि रंगघन’ चे उद्घाटन

Published on

पिंपरी, ता. २४ : गुढीपाडव्यानिमित्त ‘भरतमुनि रंगघन’ या समीप रंगमंचाचे उद्घाटन करण्यात आले. उपमहापौर शर्मिला बाबर, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष व विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या हस्ते नाटकाची तिसरी घंटा देऊन उद्घाटन झाले.
या प्रसंगी ज्येष्ठ सिनेमा दिग्दर्शक मिलिंद लेले, नाट्य-चित्रपट निर्माते प्रद्योत पेंढारकर, नगरसेवक शेखर चिंचवडे, सिने-अभिनेता पुष्कराज चिरपुटकर नरेंद्र पेंडसे यांची प्रमुख उपस्‍थिती होती.
शहरात अशा प्रकारचा रंगमंच पहिल्यांदाच साकार होत असून १८०, ३६० अंशांमध्ये रसिक प्रेक्षक कला सादरीकरणाचा आनंद घेऊ शकणार आहेत. शहरातील कलाकारांना प्रायोगिक तसेच व्यावसायिक नाट्य, नृत्याविष्कार आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी ‘भरतमुनि रंगघन’ उभे राहिले आहे.
उद्घाटनानिमित्त ‘रंगविभोर’ प्रस्तुत ‘अमृतपुत्र’ हा नाट्य, नृत्य आणि गायनाचा संगम असलेला कार्यक्रम सादर करण्यात आला. राष्ट्रीय पुरस्कार विजेते माधव जोगळेकर यांच्या लेखन व दिग्दर्शनाखाली सादर झालेल्या या कार्यक्रमाने रसिकांना खिळवून ठेवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com