त्रिवेणीनगर चौकात ‘असून अडचण, नसून खोळंबा’

त्रिवेणीनगर चौकात ‘असून अडचण, नसून खोळंबा’
Published on

पिंपरी, ता. ३ : निगडी-तळवडे मार्गावरील त्रिवेणीनगर चौक हा परिसरातील प्रमुख वाहतूक दुवा मानला जातो. औद्योगिक वसाहती, निवासी भाग तसेच मुख्य मार्गांना जोडणारा हा चौक दिवसेंदिवस अधिकच गजबजलेला होत आहे. या चौकाचे रुंदीकरण झाले, रस्ते प्रशस्त झाले. मात्र, अद्यापही या चौकातून वळण घेण्यासाठी दूरवरून वळसा मारावा लागत असून, काही सिग्नलही बंद आहेत. यामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत असून, या चौकाची सध्याची स्थिती ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशी झाली आहे.
निगडीकडून येताना तळवडेकडे जाण्यासाठी त्रिवेणीनगर येथे उजवीकडे वळण घ्यावे लागते. यासाठी त्रिवेणीनगर चौकात आयलँडही उभारले आहेत. मात्र, येथे वाहतूक कोंडी होत असल्याचे सांगत आयलँडच्या ठिकाणी पाइप टाकून येथील हा मार्ग बंद ठेवला आहे. त्यामुळे वाहनचालकांना आझाद चौकमार्गे वळसा घेऊन यावे लागत आहे.
तसेच तळवडेकडून निगडीकडे जाताना त्रिवेणीनगर चौकातील सिंगल यंत्रणा बंद आहे. त्यामुळे कशाही पद्धतीने वाहने दामटली जातात. वाहनचालकांना कोणतेही संकेत न मिळाल्याने ‘पहिले येईल तो जाईल’ अशा पद्धतीने वाहतूक सुरू आहे. यामुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणेही धोकादायक ठरत आहे.

‘‘येथील रस्त्याचे रुंदीकरण झाले. मात्र, काही कामे पूर्ण असल्याने वाहने कशाही पद्धतीने धावत असतात. यामुळे अपघाताचा धोका निर्माण होतो. तरी प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना राबवणे आवश्यक आहे.
- ज्ञानेश्वर बहिरे, वाहनचालक, निगडी

‘‘निगडीकडून येताना तळवडेकडे जाण्यासाठी वळण घेताना वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असते. त्यामुळे सध्या पुढे काही अंतरावर वाहने वळवली जात आहेत. लवकरच त्याठिकाणी योग्य नियोजन केले जाणार आहे.
- अभिमान भोसले, कार्यकारी अभियंता, महापालिका
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com