माण येथे लाच घेणाऱ्या तलाठ्याला रंगेहाथ पकडले

माण येथे लाच घेणाऱ्या तलाठ्याला रंगेहाथ पकडले
Published on

पिंपरी, ता. १९ : वडिलोपार्जित जमिनीच्या फेरफारवर नोंद करण्यासाठी लाच घेणाऱ्या तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. ही कारवाई माण तलाठी कार्यालयात मंगळवारी (ता.१९) सायंकाळी सातच्या सुमारास करण्यात आली.
मुळशी तालुक्यातील सजा माण तलाठी संतोष प्रल्हाद राणे (रा. कोंढवा) असे कारवाई झालेल्या तलाठ्याचे नाव आहे. यातील तक्रारदाराच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या वडिलोपार्जित जमिनीच्या फेरफारावर तक्रारदार व त्यांच्या भावाचे नाव नोंद करायचे होते. हे काम करण्यासाठी तलाठी संतोष राणे याने तक्रारदाराकडे सव्वा लाखांची लाच मागितली होती. यातील एक लाख रुपये यापूर्वी स्वीकारले. त्यानंतर उर्वरित २५ हजार मागितले असता तक्रारदार यांनी ‘एसीबी’कडे तक्रार दिली. त्यानुसार ‘एसीबी’ने सापळा रचून राणे याला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com