‘ग्रीन रिइमॅजिन’ : शाश्वत भविष्याची नांदी

‘ग्रीन रिइमॅजिन’ : शाश्वत भविष्याची नांदी
Published on

पिंपरी, ता. १९ : पर्यावरण संवर्धन, शाश्वत विकास आणि नैसर्गिक साधनसंपत्ती यांना अधिकाधिक चालना देण्यासाठी ‘ग्रीन रिइमॅजिन’ संकल्पना महत्त्वाची ठरणार आहे. शाश्वत व उज्ज्वल भवितव्याची ही नांदी असेल. म्हणूनच ‘सकाळ माध्यम समूह’ आणि यशदा रिॲल्टी यांनी नव्या विचारांची नवी संकल्पना मांडली आहे.

बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर विकासाची पारंपरिक पद्धत बदलून पर्यावरणपूरक आणि शाश्वत जीवनशैली स्वीकारण्याची गरज ‘ग्रीन रिइमॅजिन’ संकल्पनेतून अधोरेखित केली जात आहे. याद्वारे शहरे आणि गावांच्या विकासातही पर्यावरणाचा समतोल राखण्याची गरज व्यक्त केली जात आहे. हरित क्षेत्र वाढवणे, पावसाचे पाणी साठवणे, सौरउर्जेचा वापर वाढवणे तसेच प्लास्टिकचा वापर कमी करणे यामुळे प्रदूषण आणि नैसर्गिक साधनांवरील ताण कमी होऊ शकतो. उद्योगांनीही उत्पादन प्रक्रियेत ऊर्जा कार्यक्षमता आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची आवश्यकता आहे.

दोन हजार वृक्षारोपणाचे उद्दिष्ट
‘ग्रीन रिइमॅजिन’ संकल्पनेतून दोन हजार झाडे लावून एक हिरवेगार स्वप्न साकार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. नागरिकांनी सहकुटुंब सहभाग घेऊन झाड दत्तक घ्यायचे आणि त्याचे संवर्धन करायचा संकल्प आहे. या उपक्रमामध्ये तुम्हाला सहभागी व्हायचे असेल, तर ‘क्यूआर कोड’ स्कॅन करा आणि आपला सहभाग नोंदवा!

‘ग्रीन रिइमॅजिन’ म्हणजे काय?
- ‘ग्रीन रिइमॅजिन’ म्हणजे पर्यावरणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन नव्याने घडवणे. उर्जा बचत, अक्षय उर्जेचा वापर, कचरा व्यवस्थापन, पुनर्वापर, जलसंधारण, हरित वाहतूक आणि जैवविविधतेचे संरक्षण यांसारख्या उपायांना दैनंदिन जीवनाचा भाग करण्यावर या संकल्पनेचा भर आहे.
- ‘ग्रीन रिइमॅजिन’ ही पर्यावरणासह आर्थिक आणि सामाजिक विकासाची नवी दिशा आहे. हरित तंत्रज्ञान, स्थानिक रोजगारनिर्मिती आणि संसाधनांचा कार्यक्षम वापर यामुळे विकासासोबत पर्यावरणाचे संरक्षण साध्य होऊ शकते.
- आजच्या पिढीसमोर पर्यावरणाचे रक्षण करण्याबरोबरच भावी पिढ्यांसाठी सुरक्षित आणि निरोगी पृथ्वी निर्माण करण्याचे आव्हान आहे. त्यामुळे शासन, उद्योग, शैक्षणिक संस्था आणि नागरिक यांनी एकत्रितपणे प्रयत्न केल्यास ‘ग्रीन रिइमॅजिन’ची संकल्पना प्रत्यक्ष कृतीत उतरू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com