पिंपळे गुरव, सांगवीतील 
झाडांनी घेतला मोकळा श्वास

पिंपळे गुरव, सांगवीतील झाडांनी घेतला मोकळा श्वास

पिंपळे गुरव, ता. ६ ः लोखंडी जाळीच्या कैदेतील झाडे मुक्त कधी होणार? या मथळ्याखाली सोमवारी (ता. ५) ‘दै. सकाळ’मध्ये बातमी प्रसिद्ध झाली. या बातमीची दखल घेत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या उद्यान विभागाचे सहायक उद्यान अधिक्षक राजेश वसावे यांनी झाडांना अडसर ठरत असलेल्या लोखंडी जाळ्या तातडीने काढण्यासाठी सुरुवात केली. यामुळे पिंपळे गुरव, नवी सांगवी परिसरातील लोखंडी जाळ्यांच्या कैदेतून मुक्त झालेल्या झाडांना मोकळा श्वास घेता येणार आहे. या बातमीची तत्परतेने दखल घेतल्यामुळे मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड व सुरेश सकट यांनी ‘दै. सकाळ’चे व रमेश वसावे यांचे धन्यवाद व्यक्त केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com