क्रीडा शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदी मुकेश पवार
पिंपळे गुरव, ता. ८ ः पिंपरी चिंचवड महानगर क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदी मुकेश पवार तर सचिव म्हणून राजेंद्र पितळिया यांची निवड करण्यात आली आहे. आकुर्डी येथील म्हाळसाकांत विद्यालयाच्या सभागृहात राज्याध्यक्ष शरदचंद्र धारुरकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच नवीन कार्यकारिणीही जाहीर करण्यात आली. या सभेस महानगरातील बहुसंख्य क्रीडा शिक्षक उपस्थित होते.
कार्याध्यक्ष - अंगदराव गरड, उपाध्यक्ष - राजेंद्र महाजन, सत्यवान वाघमोडे, लक्ष्मण माने, श्रीकांत देशपांडे, योगिनी पाचारणे, सहसचिव-रामेश्वर हराळे, कोषाध्यक्ष -चंद्रशेखर कुलकर्णी, सहकोषाध्यक्ष-शिवाजी बांदल, प्रसिद्धीप्रमुख -साहेबराव जाधव, मिलिंद संधान, महिला प्रमुख -वैशाली अरगडे, सहमहिलाप्रमुख-उर्मिला हजारे, सरोजा सूर्यवंशी, सुवर्णा घोलप, पार्वती वाकळे, संघटक -सचिन नाडे, गोविंद एडके, आबाजी माने, धनाजी पाटील, आरती यादव, चिंचवड संपर्कप्रमुख - सचिन ववले, भोसरी संपर्क प्रमुख-मनोज वाबळे, पिंपरी संपर्क प्रमुख-मिलिंद माथने, आकुर्डी संपर्क प्रमुख-लक्ष्मण गुंजाळ, क्रीडा समिती-किरण अडागळे, केशव अरगडे, हरीश शिंदे, विजय टेपुगडे, अनिल लोंढे, रायगोंडा माशाळे, जीवन साळुंके, मधुकर इनामदार, प्रवीण मालवणे, कार्यकारिणी सदस्य -दत्ता कांबळे, हेमंत मखरे, संजय जनक, मंदार देसाई, संदीप माशेरे, मधुकर रासकर, अशोक शिंदे, दीपक पिंगळे, सुषमा पवार, राशी धुलिया, मुख्याध्यापक प्रतिनिधी -अशोक जाधव, पुणे विभाग प्रतिनिधी-अशोक आवारी, सल्लागार -चांगदेव पिंगळे, कविता आल्हाट, भगवान सोनवणे, अनिल नाईकरे, गंगाधर सोनवणे, मार्गदर्शक -मनोज देवळेकर.
फोटो ः 00813, 00814
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.