साथीच्या आजारावरील केंद्र ‘सलाइन’वर
कोट्यवधी रुपये खर्च करूनही काम अपूर्णच, जिल्हा रुग्णालयाकडे हस्तांतरण केव्हा?

साथीच्या आजारावरील केंद्र ‘सलाइन’वर कोट्यवधी रुपये खर्च करूनही काम अपूर्णच, जिल्हा रुग्णालयाकडे हस्तांतरण केव्हा?

साथीच्या आजारावरील केंद्र ‘सलाइन’वर
कोट्यवधी रुपये खर्च करूनही काम अपूर्णच, जिल्हा रुग्णालयाकडे हस्तांतरण केव्हा?

विजय गायकवाड ः सकाळ वृत्तसेवा
पिंपळे गुरव, ता. ३१ ः पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, जिल्हा रुग्णालयांना साथीच्या आजारासाठी उपयोगी ठरेल, असे अद्ययावत ‘प्रीफॅब स्ट्रक्चर सेंटर’ नवी सांगवीमध्ये उभारण्यात येत आहे. मात्र, गेल्या दोन वर्षापासून त्याचे काम अपूर्ण आहे.
राज्य सरकारने या प्रकल्पासाठी दोन वर्षापूर्वीच यासाठी कोट्यावधींचा निधी मंजूर केला आहे. आतापर्यंत त्यातील साडे सहा कोटी रुपयांचा निधी खर्च झाला आहे. मात्र, एवढे पैसे खर्च होऊनही कामाने वेग पकडला नसल्यामुळे या प्रकल्पाचे भवितव्य अधांतरी राहिले आहे.
जिल्हा रुग्णालयाकडे हा प्रकल्प कधी हस्तांतरित होणार, हा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
याबाबत राष्ट्रीय आरोग्य मिशन आरोग्य सर्कलचे (आयडीडब्ल्यू) कार्यकारी अभियंता मंदार कुलकर्णी म्हणाले, ‘‘विद्युत विभागाचे १०० केव्हीचे काम बाकी असून, त्यासाठी ३० लाखांच्या निधीसाठी शासनाकडे प्रस्ताव दाखल केला आहे.’’
विद्युत विभागाचे अभियंता रत्नदीप काळे यांनी कोटेशन दिले असल्याचे सांगितले. विद्युत विभागाला निधी प्राप्त होताच काम करून दिले जाईल, असे त्यांनी नमूद केले.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले म्हणाले, ‘‘हे केंद्र कोरोनाच्या काळात बांधले होते. तेथील आरोग्य सर्कलकडून इमारत पूर्ण केली आहे. मात्र, जिल्हा रूग्णालयाच्या ताब्यात न दिल्यामुळे तेथे काही सुरू करण्यात आले नाही.’’
जिल्हा रूग्णालयातील सहायक शल्य चिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे म्हणाल्या, ‘‘आमच्याकडे पुरेसा कर्मचारीवर्ग नाही. त्यामुळे नव्याने प्रीफॅब स्ट्रक्चर सेंटर सुरू करण्यासाठी मनुष्यबळ कुठून आणायचे, हा प्रश्‍न आहे.’’

‘प्रीफॅब स्ट्रक्चर सेंटर’ म्हणजे काय?
अ‍ॅल्युमिनियम स्टील, लाकूड, फायबर ग्लास आणि कॉंक्रिट वापरून, सहजरीत्या हलवता येणारे केंद्र उभी केले जाते. साथीचे आजार जिथे सुरू असतील, त्या भागात हे केंद्र नेऊन, काही तासांमध्ये तेथे त्याची पुनर्उभारणी करता येऊ शकते. तेथील रुग्णांवर उपचार करण्यासाठी याचा मोठा फायदा होत असतो.


कोट
स्वाईन फ्लू व कोरोनाच्या काळात रुग्णालयाला वेळोवेळी मिळालेल्या अनुदानातून खरेदी केलेल्या औषध, साहित्य व यंत्रसामग्रीच्या विनियोगाचे वेगळे लेखापरीक्षण होणे गरजेचे आहे.
- शरत शेट्टी, उपाध्यक्ष, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघ, महाराष्ट्र

‘‘गेल्या दोन वर्षांपासून साथीच्या रुग्णालयाचे काम चालू आहे. रुग्णांना अजून किती दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
-सुरेश सकट, सामाजिक कार्यकर्ता

फोटो- 00852

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com