नागरिकांना खोकला, श्‍वसनाचा त्रास
जलतरण तलावात गॅस गळती ः उग्र वासामुळे हरितद्रव्याचाही नाश

नागरिकांना खोकला, श्‍वसनाचा त्रास जलतरण तलावात गॅस गळती ः उग्र वासामुळे हरितद्रव्याचाही नाश

Published on

पिंपळे गुरव, ता. ११ ः कासारवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जलतरण तलावात क्लोरिन गॅसची मोठ्या प्रमाणात गळती झाल्याने तसेच परिसरात क्लोरिन गॅस पसरल्याने काही मीटरपर्यंत नागरिकांना खोकला आणि घशाचा व श्वसनाचा त्रास जाणवत होता. क्लोरिनच्या उग्र वासामुळे जलतरण तलाव परिसरातील हरितद्रव्याचा नाश झाला आहे.

परिसरातील झाडे सुकली
क्लोरिन गॅस गळतीमुळे परिसरातील वातावरण प्रदूषित ठरते. हा वायू हवेत झपाट्याने पसरल्यामुळे अतिशय कमी तीव्रतेतही तो वनस्पतींना घातक ठरला असून, जलतरण तलावाच्या परिसरातील शोभेची असणारी झाडे, सदाफुली, जास्वंद, शेवंती, आंबा, दगडी पाला अशा अनेक वनस्पतींना हा क्लोरिन वायू विषारी ठरला आहे. या झाडांचा हरितद्रव्याचा नाश होऊन पाने तांबडी पडली असून, पानांच्या कडांना व टोकांना चट्टे व भोके पडून पाने गळून पडली आहेत.

जलतरण तलाव सील
गॅस गळतीच्या घटनेनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जलतरण तलाव तातडीने सील करण्यात आला. यानंतर या जलतरण तलावाची ऑनलाइन बुकिंग तत्काळ बंद करण्यात आली आहे.

‘‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर जलतरण तलावाची पाहणी करून, या तलावात क्लोरिनचा सिलिंडर पाण्यात टाकला असल्याने पाण्याची तपासणी केली जाईल. या तलावातील पाणी बदलावे लागल्यास ते त्वरित बदलून घेण्यात येईल व तलाव पूर्ववत चालू केला जाईल.

मिनीनाथ दंडवते,
उपायुक्त, क्रीडा विभाग

कोट
‘‘पंधरा दिवसांपूर्वीच क्लोरिन गँस टाकीची तपासणी करून आणली होती. तसे कंपनीचे प्रमाणित केलेले प्रमाणपत्रही उपलब्ध आहे. पंचवीस वर्षात अशी घटना कधीही घडली नाही. घडलेली घटना खेदजनक असून, यापुढील काळात अशा प्रकारच्या घटना घडू नये म्हणून विशेष काळजी घेतली जाईल.

मुसा मुजावर,
सुपरवायझर, सुमीत स्पोर्टस
फोटोः 00990

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.