पिंपळे गुरवमध्ये वृक्षदिंडीतून पर्यावरण, संरक्षणविषयी जागरूकता
पिंपळे गुरव, ता. ११ ः गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या वतीने ८ ते ८० उद्यानाच्या बाजूला आयोजित वृक्षदिंडीत पर्यावरण जनजागृतीला विशेष चालना मिळाली. कार्यक्रमाची सुरुवात वृक्षमित्र अरुण पवार व डॉ. भारती चव्हाण यांच्या हस्ते वृक्ष पालखीचे पूजन करून करण्यात आली. दिगंबर राणे यांनी गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात केली.
वृक्षदिंडीत मंडळाचे कोअर कमिटी सदस्य अण्णा जोगदंड यांनी शर्टवर लिहिलेले पर्यावरण जनजागृतीचे संदेश दाखवून जनतेचे लक्ष वेधले. यावेळी रामदास महाराज साबळे यांनी तुकाराम महाराजांची भूमिका साकारली, ज्यात त्यांनी पर्यावरण संवर्धनाच्या विचारांचा प्रसार केला. तसेच, किरण कांबळे यांनी डोक्यावर झाड व तोंडाला ऑक्सिजनचा मास्क लावून पर्यावरणाच्या संदेशाचा प्रसार केला.
वृक्षदिंडी दरम्यान, ‘वृक्षवल्ली आम्हा, सोयरे, वनचरे’ या भजनाच्या सुरात पर्यावरणाच्या स्लोगन हातात घेऊन, संपूर्ण परिसरात जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमातून स्थानिक नागरिकांमध्ये पर्यावरणाचे महत्त्व आणि त्याचे संरक्षण करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.
याप्रसंगी डॉ. भारती चव्हाण यांनी नागरिकांना प्रगतीसाठी वृक्षतोड कमी करण्याचे आणि प्रदूषण रोखण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन केले. वृक्षमित्र अरुण पवार यांनी निसर्गाशी आदराने वागण्याचा संदेश दिला आणि ५०० झाडांचे मोफत वृक्षारोपण करण्याचे आवाहन केले.
यावेळी तानाजी एकोंडे, राजेश हजारे, निनाभाऊ दुधाळ, कृष्णा परीट, रमेश बंड, राजू उभे, विलास चोपडे, श्यामराव महाराज गायकवाड, बळिराम कातंगळे, नंदकुमार धुमाळ, अमोल लोंढे, दत्तात्रेय धोंडगे, सूर्यकांत कुरुलकर, किशोर अटरगेकर, संदीप पाटील, संतोष नलावडे, अनिता पांचाळ, सुरेश कंक आदी उपस्थित होते. गुणवंत कामगार बाळासाहेब साळुंके, महमशरीफ मुलाणी, अण्णा जोगदंड, महेंद्र गायकवाड यांनी आयोजन केले होते. श्रीकांत कदम यांनी आभार प्रदर्शन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

