पी. के. इंटरनॅशनल स्कूलमध्ये संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात
पिंपळे सौदागर, ता. १६ ः व्ही. एच. बी. पी. पांडुरंग काटे प्रतिष्ठान संचालित पी. के. इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर महाविद्यालयामध्ये संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी युगपुरुषांच्या प्रतिमेचे पूजन शाळेचे संस्थापक डॉ. जगन्नाथ काटे व प्राचार्या डॉ. धनश्री सोनवणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. संस्थापक डॉ. काटे म्हणाले, ‘संत सेवालाल महाराज हे भारतीय समाजसुधारक आणि बंजारा समाजाचे आराध्य दैवत होते. त्यांनी समाजाला क्रांतिकारी विचारांचे दिलेले बोल वास्तववादी विचार करण्यास भाग पाडले.’ सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पियूषा राठी व योगिता नाशिककर यांनी केले.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

