

पिंपळे गुरव, ता.३० ः गायिका संज्योती जगदाळे यांचा लावण्यवती या लोकसंगीतावर आधारित आगळा वेगळा कार्यक्रमाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रेक्षकांनी विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी ठेका धरत आनंद लुटला.
नटसम्राट निळू फुले नाट्य मंदिरात वरील कार्यक्रम झाला. लोककलेमधील महिला कलाकारांना मानवंदना देणे आणि लोकसंगीताची आवड निर्माण करत लावणीला चांगला दर्जा मिळवून देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू होता. लोककलेत विविध प्रकार आहेत. मात्र, त्यात लावणीला वेगळे स्थान आहे. सध्या काळात लोककलेचे स्वरूप बदलत असून लावणीचा दर्जा टिकवण्यासाठी आणि तिला तिच्या मूळ स्वरूपात जपण्यासाठी संज्योती जगदाळे यांनी कार्यक्रमाद्वारे विशेष प्रयत्न केले.
कार्यक्रमात एकूण १८ लावण्या सादर करण्यात आल्या. त्यामध्ये ‘पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा’, ‘राया मला पावसात नेऊ नका’, ‘इश्काची इंगळी डसली’, ‘पदरावरती जरतारीचा’, ‘बाई माझी करंगळी मोडली’, ‘रेशमाच्या रेघांनी’, ‘आता वाजले की बारा’ या सारख्या लोकप्रिय आणि गाजलेल्या लावण्यांचा समावेश होता. रसिक प्रेक्षकांनी त्यांना भरभरून दाद दिली. उत्स्फूर्त प्रतिसाद देत ताल धरला.
या कार्यक्रमात ढोलकीवर समर्थ कांबळे, तबला हनुमंत चौघुले, गिटार साटम रितिक, बासरी अमोल रबाडे, हार्मोनियम स्वानंद जाधव, कीबोर्ड मनोज जोशी यांनी साथसंगत केली; तर कोरस गायनामध्ये अमृता कुलकर्णी आणि श्रावणी पाटील यांनी सहभाग घेतला. लोककला आणि लावणी जिवंत ठेवण्यासाठी संज्योती जगदाळे यांचा हा उपक्रम एक प्रेरणादायी पाऊल आहे. भविष्यात असे कार्यक्रम सातत्याने होत राहावेत आणि नव्या पिढीला लोककलेच्या समृद्ध वारशाची ओळख व्हावी, अशी इच्छा रसिकांनी व्यक्त केली. निवेदक विशाल गोंधळी यांनी सूत्रसंचालन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.