पिंपरी-चिंचवड
साईबाबांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना
पिंपळे गुरव, ता.१३ ः सांगवी फाटा येथे गुरुपौर्णिमेनिमित्त साईबाबांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. मोठ्या भक्तिभावाने भाविकांनी साईबाबांचे दर्शन घेतले.
संजय गांधी निराधार योजनेचे सचिव संजय मराठे यांच्या हस्ते विधिवत पूजा करून साईंच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. विद्युत रोषणाई, आकर्षक रांगोळी, फुलांच्या माळांनी मंदिर परिसर उजळून निघाला होता. होमहवन, सत्यनारायण महापूजा, तीर्थ प्रसाद, महाप्रसाद वाटप करण्यात आले. रमेश चौधरी, तौफिक सय्यद, रमेश गाढवे, राजू मोरे, प्रवीण भोसले, गिरीश देवकाते, वैभव चांदगुडे, सचिन खराडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.