आरएमसी डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
पिंपळे गुरव, ता. १ : आरएमसी डंपरने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात पिंपळे सौदागरमधील पी. के. चौक येथे शुक्रवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास घडला.
पंडितराव माधवराव समर्थ (वय अंदाजे ६६) असे या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते बिजलीनगर, चिंचवड येथील रहिवासी असल्याचे समजते. या अपघाताबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ‘पंडितराव समर्थ हे दुचाकीवरून (एमएच १४-जेक्यू ६५३४) पी. के. चौकातून कोकणे चौकाकडे जात होते. दरम्यान, आरएमसी मिक्सरचा (एमएच १४- एलएच १७९१) चालक हे वाहन भरधाव नेत होता. त्यावेळी त्याचे नियंत्रण सुटल्याने मिक्सरची धडक समर्थ यांच्या दुचाकीला बसली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. सदर वाहनचालकला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक तपास सांगवी पोलिस करत आहेत.
PNE25V36487
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.