लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त सांगवीत कार्यक्रम
पिंपळे गुरव, ता. ३ ः साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त नवी सांगवी पोलिस ठाणे येथे तथागत बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्यावतीने अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
सहाय्यक पोलिस निरीक्षक युवराज कलकुटगे यांनी प्रतिमेचे पूजन केले. यावेळी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे पोलिस निरीक्षक अमोल नांदेकर यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. याप्रसंगी सांगवी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कोळी, राजेंद्र जगताप, अरुण पवार, संजय मराठे, कैलास बनसोडे, डॉ. अनिल वागळे, सुखदेव चोरमले, जालिंदर सरवदे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना भारतीय संविधान आणि ‘फकिरा’ कादंबरी भेट देण्यात आली. मगन सावंत यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दिलीप शेलार, गुलाब गायकवाड, अशोक बोरसे, विजय धनगर, विलास घनवट, मानसिंग कांबळे, सुभाष समेळ यांनी विशेष मेहनत घेतली. प्रकाश चांदगुडे यांनी आभार मानले.