पिंपरी-चिंचवड
शनाया सोनवणेला सुवर्ण
पिंपळे सौदागर, ता. ७ ः चॅलेंजर पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी शनाया सोनवणे हिने राज्य मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पदक पटकाविले. कठोर परिश्रम, जिद्द आणि उत्कृष्ट खेळाच्या बळावर शनायाने ही कामगिरी साध्य केली.
या यशाबद्दल शाळेचे संचालक संदीप काटे यांनी अभिनंदन करताना शनायाची ही कामगिरी शाळेसाठी अभिमानास्पद असून इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे नमूद केले. शाळेच्या कॉर्डिनेटर श्वेता कांत यांनीही शुभेच्छा देताना क्रीडा क्षेत्रातील सातत्यपूर्ण मेहनत आणि शिस्त हे यशाचे गमक आहे. शनायाने ते सिद्ध केले असल्याचे सांगितले.
शाळेच्या क्रीडा शिक्षिका कार्तिकला गायकवाड यांचे तिला वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.
PMG25B02661