मंदिर प्रतिकृती अन् आकर्षक सजावटी

मंदिर प्रतिकृती अन् आकर्षक सजावटी

Published on

पिंपळे गुरव, ता. ३० ः जिवंत देखाव्यांतून समाज प्रबोधन...पौराणिक देखाव्यांतून भक्तीभावाची पेरणी...पर्यावरण संरक्षण झाडे लावा झाडे जगवा..विद्युत रोषणाईचा झगमगाट...विठ्ठल रुक्मिणी मंदिर देखावा... गणेश उत्सवातील देखावा सादर करण्यात मंडळांची कल्पकता...असे चित्र पिंपळे गुरव, नवी सांगवीतील गणेश उत्सवात पाहायला मिळत आहे.
नवी सांगवी येथील साई चौक रस्त्यावरील चैत्रबन मित्र मंडळ यांनी पर्यावरण संरक्षण झाडे लावा झाडे जगवा वृक्षारोपण काळाची गरज असा देखावा सादर केला आहे. सहा फुटी गणपतीची मूर्ती असून, मंडळाचे अध्यक्ष अमोल वाडते आहेत. फेमस चौक नवी सांगवी श्री समर्थ नगर तरुण मित्र मंडळ नवी सांगवी या मंडळाने विठ्ठल रुक्मिणी मंदिर देखावा फुलांची आकर्षक सजावट केली आहे. मंडळाचे अध्यक्ष आशिष रणवरे आहेत. स्वामी विवेकानंद नगर मित्र मंडळाने श्री स्वामी समर्थ देखावा सादर केला आहे. रोज भजन सेवा ठेवण्यात आली आहे. शिवप्रतिष्ठान मित्र मंडळ, शिवप्रतिष्ठान चौक मंडळाने आकर्षक फुलांची सजावट व विद्युत रोषणाई सादर केली आहे. मंडळाचे अध्यक्ष प्रशांत मादुर आहे. समता नगर मित्र मंडळाचे अध्यक्ष निखिल जगताप असून, भजन, जादूचे प्रयोग, मंगळागौर आदी सात दिवस कार्यक्रम रेलचेल. गणेश मूर्तीस आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
शिवराय मित्र मंडळाने आगळा वेगळा ‘पुस्तक बोलतोय’ हा समाज प्रबोधन करणारा देखावा सादर केला आहे. यामध्ये पुस्तकांची शाळा, मोबाईलच्या युगात पुस्तकांचा वाचक वर्ग कमी होत असल्याने पुस्तके मुलांनी वाचावी यासाठी आकर्षक पुस्तकांची सजावट केली आहे. मंडळाचे अध्यक्ष रोहित भिसे आहे.
कवडेनगरमधील भारत मित्र मंडळाने फुलांची आरास केली आहे.
जय भवानी मित्र मंडळ आदर्श नगर मंडळाने आकर्षित फुलांची सजावट केली आहे. मंडळाचे अध्यक्ष संदीप शितोळे आहे. कृष्णा चौकातील कीर्तीनगर मित्र मंडळाने आकर्षक फुलांची सजावट केली आहे. मोराच्या रथात गणेश विराजमान असा सुंदर देखावा तयार केला आहे. मंडळाचे अध्यक्ष अक्षय खाडे आहे.
बारामती मित्र मंडळाने ‘पुणेरी पाट्या’ नियमांचे पालन केल्यास नागरिकांचे जीवन सुखकर होते. त्यासाठी पुणेरी पाट्याच्या स्वरूपात देखावा सादर करण्यात आला आहे. पुणेरी फाट्याच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचा प्रयत्न करण्यात आला आहे. मंडळाचे अध्यक्ष सुरेश लोखंडे आहे.
अखिल क्रांती चौक मित्र मंडळाने साडेसात फूट उंच गणेशाची मूर्तीच्या भोवती काच महल रथाची आकर्षक सजावट केली आहे. मंडळाचे अध्यक्ष भास्कर मोरे आहे.
महाराष्ट्र मित्र मंडळाने गणपती विराजमान असलेला बैलगाडा व आजूबाजूला फुलांची आकर्षक सजावट केली आहे. अध्यक्ष मनीष भापकर आहे. संत तुकाराम नगर मित्र मंडळाने आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांची सजावट केली आहे. अध्यक्ष अजय वाघमारे आहे.
पिंपळे गुरव येथील विद्यानगर मित्र मंडळाने भव्य बालाजी हत्ती रथ सादर केला आहे. अध्यक्ष सागर निर्मळ आहे. नेताजी नगर मित्र मंडळ आकर्षक फुलांची सजावट विद्युत रोषणाई सादर केली आहे. मंडळाचे अध्यक्ष सचिन खराडे आहे. स्वराज्य मित्र मंडळाने अतिशय सुबक फुलांमध्ये अष्टविनायक दर्शन आकर्षक सजावट हा देखावा सादर केला आहे. या मंडळाचे अध्यक्ष साई नेटके आहे.
नवयुग मित्र मंडळ कवडे नगर पिंपळे गुरव बारा फुटी सिंहासनास्थ गणराज मूर्ती स्थापन केली आहे. या मंडळाचे अध्यक्ष डॉ. दत्तात्रेय गायकवाड आहे. अखिल रामनगर मित्र मंडळ पिंपळे गुरव या मंडळांनी यावर्षी आकर्षक फुलांची सजावट व विद्युत रोषणाई सादर केली आहे. मंडळाचे अध्यक्ष सौरभ बोरसे आहे.
जागृती मित्र मंडळाने गाण्यावर ठेका धरणारी विद्युत रोषणाई केली असून, आकर्षक फुलांची सजावट केली आहे. अध्यक्ष रुपेश नवले आहे. भैरवनाथ तरुण मंडळाने राधाकृष्ण शीश महाल तयार केले आहे. मंडळाचे अध्यक्ष दिवंगत आमदार शंकर जगताप आहे. श्री छत्रपती शिवाजी मित्र मंडळाने यावर्षी भगवान शिव शंकर यांच्यावर आधारित ‘अघोरी विद्या’ हा जिवंत देखावा सादर केला आहे. मंडळाचे अध्यक्ष अध्यक्ष गणपत देवकर आहे.
श्री साईनाथ मित्र मंडळ पिंपळे गुरव कठपुतळी देखव्यातून समाज प्रबोधन केले आहे. मंडळाचे अध्यक्ष योगेश कदम आहे. भैरवनाथ तरुण मंडळ, काशीद वस्ती, पिंपळे गुरव या मंडळांने फुलांचे आकर्षक सजावट तसेच जिवंत देखावा ‘गुन्हेगारी भयानक अंत’ सामाजिक जनजागृती पर देखावा सादर केला आहे. मंडळाचे अध्यक्ष विक्रम काशीद आहे.
अनंत नगर तरुण मित्र मंडळाने ‘स्वामी समर्थ मठ’ देखावा सादर केला आहे स्वामी दरबार मंडप विद्युत रोषणाईसह श्री स्वामी समर्थ यांचा माहितीपट उलगडणारी भिंती चित्र असा भव्य देखावा सादर केला आहे. मंडळाचे अध्यक्ष शुभम पवार आहे
श्रीनिवास वेस्टसाईड काउंटी सोसायटीने युनेस्कोच्या वारसा यादीतील ११ महाराष्ट्रातील व जिंजी किल्ल्यांचा देखावा साकारला आहे. रहिवाशांनी वेगळ्या प्रयत्नांतून हा आकर्षक देखावा बनवला असून, गणेशोत्सवात सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धांच्या आयोजनातून एकत्र आणले आहे. मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com