पिंपरी चिंचवड महापालिका प्रभाग ३१ :
प्रभाग ३१ ः नवी सांगवी- पिंपळे गुरव
विविध समाजघटकांवर 
विजय अवलंबून 
- विजय गायकवाड 
न वी सांगवी- पिंपळे गुरव प्रभाग ३१ मध्ये मध्यम वर्ग व कामगार वर्गाची लोकसंख्या आहे. सुशिक्षित व नोकरदार, उद्योग-व्यावसायिकांचा त्यामध्ये समावेश असून, धार्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक संस्था प्रभागात सक्रिय आहेत. प्रभागात मतदारांची संख्या संमिश्र असून, कोणत्याही एका समाजावर विजय अवलंबून राहिलेला नसल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे. २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपला चार जागा मिळाल्या होत्या. एका जागेवर अपक्ष उमेदवाराने बाजी मारली.
समाविष्ट भाग
नवी सांगवी, विद्यानगर, गणेशनगर, पिंपळे गुरव, उरो रुग्णालय, गजानन महाराजनगर, बाबूराव घोलप विद्यालय, साई मंदिर चौक आदी.
पक्षीय स्थिती
- भाजपने प्रचार यंत्रणा मजबूत करण्यावर भर, नव्या चेहऱ्यांना संधीची शक्यता
- राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांची संघटनशक्ती मर्यादित
- काँग्रेसकडून स्वतंत्र उमेदवाराचा विचार
- शिवसेनेकडून पक्षाची पायाभरणी करण्याचा प्रयत्न
दृष्टिक्षेपात
- मतदारांची पक्षनिष्ठा आणि स्थानिक व्यक्तिमत्त्व यांचा समतोल निर्णायक 
- भाजपचे संघटन, जनसंपर्क हे बलस्थान; तर अपक्ष उमेदवारांची वैयक्तिक ओळख, कार्य हे आव्हान 
- काही प्रस्थापित कार्यकर्ते पुन्हा एकदा अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याची शक्यता
संभाव्य मुद्दे 
- अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती, वाहतुकीची व्यवस्था
- पाणीपुरवठा, सांडपाणी वाहिनी, अपुरे वाहनतळ
- अतिक्रमणे, उद्यान व सार्वजनिक ठिकाणांची निगा
- आरोग्य सेवा, सुरक्षा आणि सांस्कृतिक उपक्रम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

