सुधारित पिंपळे गुरव (प्रभाग क्र.२९)

सुधारित पिंपळे गुरव (प्रभाग क्र.२९)

Published on

प्रभाग २९ ः पिंपळे गुरव
--------
नव्या सोसायट्यांचा
कल निर्णायक

- विजय गायकवाड
पिं पळे गुरव प्रभागात स्थानिक आणि बाहेरचा मतदार यांचे प्रमाण निम्मे-निम्मे आहे. अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा, अविकसित आरक्षणे, जुन्या-नव्या सोसायट्यांचे प्रश्न आदी समस्या आहे. नव्या सोसायट्यांतील मतदारांचा कल निर्णायक ठरणार असल्याचे चित्र आहे. भाजपने २०१७ मध्ये प्रभागातील चारही जागा जिंकून एकहाती वर्चस्व मिळवले. राष्ट्रवादी काँग्रेसकडे पारंपरिक सामाजिक जाळे असूनही स्थानिक नेतृत्वाच्या कमतरतेमुळे त्यांना येथे अपयश आले. राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्यात अंतर्गत स्पर्धा आहे. काँग्रेस गोटामध्ये सध्यातरी शांतता आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार नसण्याची शक्यता आहे. वंचित व इतर पक्षांतही अद्याप हालचाल नसल्याचे दिसते.

समाविष्ट भाग
पिंपळे गुरव गावठाण, कल्पतरू इस्टेट, गुलमोहोर कॉलनी, सुदर्शननगर, क्रांतीनगर, काशीद पार्क, जवळकरनगर, शिवनेरी कॉलनी, ओमकार कॉलनी, गोकुळनगरी, भालेकरनगर आदी परिसर.

पक्षीय स्थिती
- भाजपची पूर्ण तयारी, इच्छुकांच्या संख्येत वाढ
- भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, काँग्रेसमध्ये लढतीची शक्यता
- सोसायट्यांमधील मतदार, काही समाज घटकांमध्ये पकड मजबूत करण्याचा प्रयत्न
- शिवसेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांकडून उमेदवार चाचपणी सुरू

दृष्टीक्षेपात...
- सोसायट्यांमधून सुमारे सात हजार नवे मतदार
- भाजपचे प्रचार संघटन मजबूत
- दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये उमेदवारांसाठी चढाओढ
- शिवसेनेला नव्या मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान

प्रचारातील संभाव्य मुद्दे
पाणीपुरवठा, विकासकामे, सोसायट्यांचे प्रश्न, वाहतूक कोंडी आदी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com