श्री दत्त साई सेवा कुंज आश्रमात दत्तजयंती उत्सवाला सुरुवात
पिंपळे गुरव, ता. २८ : कासारवाडी-पिंपळे गुरव रस्त्यावरील श्री दत्त साई सेवा कुंज आश्रमात दत्तजयंती उत्सवाला सुरुवात झाली आहे. श्री दत्त साई सेवा ट्रस्ट व स्व. लक्ष्मणभाऊ जगताप मित्र परिवारातर्फे याचे आयोजन करण्यात आले आहे.
पद्मश्री गिरीश प्रभुणे, राजेंद्र उमाप, चैतन्य महाराज लोंढे, राघवचैतन्य महाराज, विजय जगताप, जालिंदर महाराज मोरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या निमित्त आश्रम परिसर सुशोभीत करण्यात आला आहे. येथे पहाटे ४ ते ६ वाजेपर्यंत काकड आरती, सकाळी ७ ते ९ श्री गुरुचरित्र पारायण निवृत्ती महाराज बोरकर शास्त्री व धारूतात्या बालवडकर यांचे प्रवचन झाले. पाच डिसेंबरपर्यंत दररोज दुपारी एक ते २ वाजता विविध महिला भजनी मंडळे भजन सादर करणार आहेत. सायंकाळी ७ ते ९ कीर्तन सेवा होईल.
या प्रसंगी माजी आमदार विलास लांडे यांनी मनोगतात ‘‘गुरूचरित्र पारायण व कीर्तनाने परमार्थ लाभ होतो,’’ असे सांगितले. राघवचैतन्य महाराज यांनी हिंदू स्वाभिमान व सांप्रदायिक प्रगतीवर भर दिला. श्री दत्त आश्रम सांगवीचे तुकाराम महाराज भाऊ यांनी सामाजिक सलोखा, संस्कृती व संस्कार धार्मिक परंपरेने पुढे नेण्यावर मार्गदर्शन केले. भंडारा डोंगर मंदिर संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद यांनी प्रतिवर्षीचा पारायण सोहळा आनंदाने साजरा होतो, असे सांगितले. गिरीश प्रभुणे यांनी दरवर्षी नित्यनियमाने हा सोहळा होतो, असे सांगितले. शिवानंद महाराज यांनी आश्रमाची वाटचाल सांगितली. या प्रसंगी आमदार उमा खापरे, उज्ज्वला गावडे, नाना काटे, उद्योजक विजय जगताप, महेश जगताप, शशिकांत कदम, राहुल जवळकर, संजय भिसे, बाळासाहेब देवकर, सुनील येडे, विजूअण्णा जगताप आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन नामदेव तळपे यांनी, तर आभार माजी महापौर माई ढोरे यांनी मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

