नादुरुस्त सिग्नलमुळे कोंडी अपघाताचाही धोका

नादुरुस्त सिग्नलमुळे कोंडी अपघाताचाही धोका

Published on

पिंपळे सौदागर, ता. १ ः पिंपळे सौदागर परिसरातील स्वराज गार्डन चौकात कोकणे चौकाकडून नाशिक फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर डाव्या बाजूचा वाहतूक सिग्नल बंद अवस्थेत आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या महत्त्वाच्या चौकातून दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असताना सिग्नल बंद असल्यामुळे वाहनचालकांमध्ये गोंधळ निर्माण होत आहे.
विशेषतः सकाळ व संध्याकाळच्या गर्दीच्यावेळेत या ठिकाणी वाहतूक कोंडी होत असून, अपघातांचा धोका वाढला आहे. सिग्नल कार्यरत नसल्याने दुचाकी, रिक्षा व चारचाकी वाहनचालकांना अंदाजाने वाहने चालवावी लागत आहेत. त्यामुळे नियमांचे उल्लंघन होत असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सिग्नलची प्रत्यक्ष पाहणी करून त्याची तातडीने दुरुस्ती करून तो कार्यान्वित करण्यात येईल. वाहनचालक व नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल.
- सुदाम पाचोरकर, पोलिस निरीक्षक, सांगवी वाहतूक शाखा

स्वराज गार्डन चौकातील डाव्या बाजूचा सिग्नल बंद असल्यामुळे रोजच वाहतुकीचा गोंधळ उडतो आहे. विशेषतः गर्दीच्यावेळेत अपघाताचा धोका वाढला असून प्रशासनाने तातडीने सिग्नल दुरुस्त करून नागरिकांना दिलासा द्यावा.
- देविदास राजपूत, दुचाकीस्वार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com