‘केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७’ वर विद्यार्थ्यांची कार्यशाळा
पिंपळे गुरव, ता. १७ ः बाबूरावजी घोलप महाविद्यालय व डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नवी सांगवी येथील बाबूरावजी घोलप महाविद्यालयात ‘केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७’ या विषयावर विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
प्रास्ताविक अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. क्रांती बोरावके यांनी केले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. देवकी राठोड यांनी अर्थसंकल्पातील प्रमुख तरतुदी, महसूल व खर्चाची रचना, कृषी, शिक्षण, आरोग्य, रोजगार, करप्रणाली आदी घटकांवर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. संगीता जगताप होत्या. त्यांनी अध्यक्षीय मनोगतातून विद्यार्थ्यांनी अर्थसंकल्पाचा केवळ अभ्यास न करता त्याचा समाज, शेतकरी व युवकांवर होणारा परिणाम समजून घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
या कार्यशाळेत ४० विद्यार्थ्यांनी अर्थसंकल्पातील विविध घटकांवर विश्लेषण सादर केले. या सादरीकरणांचे मूल्यमापन प्रा. सागर कांबळे व प्रा. विक्रम मालतुमकर यांनी परीक्षक म्हणून केले.
कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. रोहिणी येवले यांनी नियोजन केले. सूत्रसंचालन डॉ. सुनील वाघ यांनी केले. आभार डॉ. दिपाली चिंचवडे यांनी मानले.
या प्रसंगी डॉ. विशाल पावसे, डॉ. रमाकांत कस्पटे, डॉ. मनीषा खैरे, प्रा. राजेंद्र भोईवार, डॉ. दत्तात्रय फटांगडे, प्रा. अक्षय कामठे, प्रा. अथर्व गायकवाड तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
PMG26B03128
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

