पवनाथडी जत्रेला उत्साहात सुरुवात

पवनाथडी जत्रेला उत्साहात सुरुवात

Published on

पिंपळे गुरव, ता. २५ ः पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या वतीने आयोजित पवनाथडी जत्रेला बुधवारी (ता.२५) सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर उत्साहात सुरूवात झाली. १ मार्चपर्यंत ही जत्रा सुरू राहणार आहे.
आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते जत्रेचे उद्‍घाटन करण्यात आले. या कार्यक्रमास उपमहापौर शर्मिला बाबर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, गटनेते प्रशांत शितोळे, नगरसेवक श्याम जगताप, अभिजित बारणे, पल्लवी जगताप, आरती चोंधे, अनिता काटे, कुंदा भिसे, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर,अतिरिक्त आयुक्त विक्रांत बागडे, उपायुक्त ममता शिंदे, स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जत्रेमध्ये महिला बचत गटांनी तयार केलेले हस्तकला साहित्य, घरगुती खाद्यपदार्थ, वस्त्रप्रकार, सजावटीच्या वस्तू आदींचे आकर्षक स्टॉल उभारण्यात आले आहेत. जत्रेत महिला स्वयंसहाय्यता बचत गटांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांचे विक्री व प्रदर्शन भरविण्यात आले आहे. जत्रेनिमित्त रोज सांस्कृतिक कार्यक्रम, मार्गदर्शन सत्रे आणि विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. उपायुक्त ममता शिंदे यांनी प्रास्ताविक केले. प्रफुल्ल पुराणिक यांनी सूत्रसंचालन केले; तर राणी पठारे यांनी आभार मानले.

पर्यावरणावर संदेश
‘झाडे लावा - जीवन समृद्ध करा’ यासारख्या विषयांवरील पथनाट्याद्वारे यावेळी समाज प्रबोधन करण्यात आले. या पथनाट्यात बाळासाहेब निकाळजे, संजय मगर, हेमा कोरबरी आणि रणजित लालबगी यांनी भूमिका साकारल्या. गणेश गायकवाड यांनी वासुदेवाची पारंपरिक वेशभूषा साकारत कार्यक्रमात रंगत आणली. राजेंद्र वाडेकर यांच्या ‘जय शिव मल्हार’ पार्टीकडून जागरण-गोंधळ सादर करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com