

पिंपळे सौदागर, ता. २६ ः पिंपळे सौदागर येथील द जरवरी अपार्टमेंटच्या नावावरून सुरू असलेला वाद अखेर संपुष्टात आला. भूमी अभिलेख अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयामुळे मिळकत पत्रिकेतील चुकीची नोंद दुरुस्त करण्यात आली असून त्याने रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या प्रकरणात, २०१५ मध्ये संबंधित बांधकाम व्यावसायिकाने ‘द जरवरी अपार्टमेंट कंडोमिनियम’ या प्रकल्पाच्या नावाने कन्व्हेयन्स डीड केले होते. मात्र, ३० जून २०२० रोजी फेरफार करताना मिळकत पत्रिकेत चुकीने ‘जरवरी सहकारी गृहरचना संस्था मर्या.’ असे नाव नोंदवण्यात आले. त्यामुळे अनेक वर्षे गोंधळ निर्माण झाला होता.
या संदर्भात भूमी अभिलेख अधिकारी अमित ननावरे यांच्यासमोर सुनावणी झाली. सादर केलेले कागदपत्रे आणि दोन्ही बाजूंचा युक्तिवाद तपासल्यानंतर, मूळ दस्तऐवजामध्ये ‘कंडोमिनियम’चा स्पष्ट उल्लेख असल्याने मिळकत पत्रिकेतील ‘सहकारी संस्था’ ही नोंद चुकीची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे ती नोंद रद्द करून ‘द जरवरी अपार्टमेंट कंडोमिनियम’ असे योग्य नाव नोंदवण्याचे आदेश देण्यात आले. या निर्णयामुळे प्रलंबित वाद मिटला असून भविष्यातील कायदेशीर अडचणी टळल्या आहेत. या प्रकरणात ज्येष्ठ नागरिक यशवंत चौधरी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. आवश्यक पुरावे सादर करून त्यांनी ही चूक दुरुस्त करण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले.
‘द जरवरी अपार्टमेंट कंडोमिनियम’ या नावाने मूळ दस्त असताना चुकीच्या माहितीच्या आधारे ‘जरवरी गृहनिर्माण गृहरचना’ अशा नावाची नोंद झाली होती. संबंधित फेरफार ज्या दस्तावरून करण्यात आला. त्यात ‘द जरवरी अपार्टमेंट कंडोमिनियम’, असे स्पष्ट नमूद असल्याने तीच नोंद ग्राह्य धरण्यात आली. चुकीचे नाव कमी करून योग्य त्या प्रमाणे ‘द जरवरी अपार्टमेंट कंडोमिनियम’ या नावाने फेरफार नोटेशन करण्यात आले आहे.
- अमित ननावरे, भूमी अभिलेख अधिकारी, पिंपरी चिंचवड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.