
प्रजासत्ताक दिनची तयारी
पिंपरी, ता.२५ ः प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शाळा, महाविद्यालयांमध्ये कवायती, बँड, सलामी याची रंगीत तालीम झाली. गेल्या काही दिवसांपासून मैदानांवर तयारी सुरू होती. विद्यार्थ्यांचा अमाप उत्साह दिसून आला. गुरुवारी सकाळी साडेआठला सर्व शाळांनी ध्वजवंदन करावे असे आदेश प्रशासनाने काढलेले आहेत.
कोरोनानंतर दोन वर्षानंतर शाळा -महाविद्यालयांमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येत आहे. त्यामुळे शाळांमध्ये विद्यार्थ्यांची जय्यत तयारी सुरू आहे. १५ दिवसांपासून सकाळच्या बोचऱ्या थंडीत कवायतीचा सराव विद्यार्थ्यांनी केला आहे. यानिमित्त शाळांमध्ये विविध सांस्कृतिक सांस्कृतिक कार्यक्रम होतात. या पार्श्वभूमीवर विविध राष्ट्रगीतावर नृत्य सादरीकरणाची सराव केला आहे. तसेच सर्व शाळांमध्ये कवायतींच्या सरावासाठी एनसीसी, स्काऊटचे विद्यार्थ्यांनी तयारी केली आहे. कवायतीच्या ठिकाणी तिरंगी पताक्यांनी विशेष सजावट केलेली आहे. दरम्यान, बाजारपेठांमध्ये विविध साहित्य विशेष सजावट करून लावलेले आहे. यामध्ये विविध आकारातील ध्वज, तीन रंगातील ड्रेसचा समावेश आहे.