Thur, March 23, 2023

विविध तीर्थस्थळावर
१४३ भाविकांकडून दर्शन
विविध तीर्थस्थळावर १४३ भाविकांकडून दर्शन
Published on : 30 January 2023, 10:38 am
पिंपरी, ता. ३० ः अग्रवाल समाज फेडरेशनच्या गोल्डन क्लबने आयोजित केलेल्या दोन दिवसीय आंतरराज्यीय आध्यात्मिक यात्रेची भक्तिभावाने आणि उत्साहात सांगता झाली. यामध्ये १४३ जण सहभागी झाले होते.
तुळजापूर येथील माँ तुळजा भवानी, अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराज, गाणगापूर येथील श्री दत्तात्रेय आणि पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी व माता महालक्ष्मी आदींचे दर्शन घेतले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गोल्डन क्लबचे अध्यक्ष सी. ए. विनोद अग्रवाल, उपाध्यक्ष सुनील गर्ग, मुख्य समन्वयक संजीव ओमप्रकाश अग्रवाल, सरस्वती गोयल, के. बी. गोयल, जयकिशन गोयल, मीना देवेंद्र गोयल, दर्शना गर्ग, अंजू गर्ग यांनी केले.