रंगनाथ गोडगे पाटील यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रंगनाथ गोडगे पाटील यांचे निधन
रंगनाथ गोडगे पाटील यांचे निधन

रंगनाथ गोडगे पाटील यांचे निधन

sakal_logo
By

पिंपरी, ता. २८ ः आकुर्डी प्राधिकरणातील ज्येष्ठ उद्योजक रंगनाथ गोडगे पाटील (वय ६८) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून, एक मुलगी व नातवंडे असा परिवार आहे. शिर्डीजवळील पोहेगाव (ता. राहाता, जि. नगर) हे त्यांचे मूळगाव. चाळीस वर्षांपूर्वी कामानिमित्त ते आकुर्डीत आले. बजाज ऑटो कंपनीत कामगार म्हणून रुजू झाले. काही वर्षांनी त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. त्याचे रुपांतर उद्योगात झाले. आता त्यांच्या दोन कंपन्या आहेत. ‘रिकाम्या हातांना काम देणारी माणसं’ असं त्यांच्या उद्योगाचे ब्रीद आहे. संगमनेरजवळील आर्वी गावात आदिवासी मुलांसाठी त्यांनी शाळा सुरू केली आहे.
फोटोः